भारतीय जैन संघटना व जैन समाज पाचोरा यांनी पाचोरा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नातेवाईकांच्या मदतीला आले धावून..!!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भारतीय जैन संघटना व जैन समाज पाचोरा यांनी पाचोरा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नातेवाईकांच्या मदतीला आले धावून..!!
*पाचोरा येथील भारतीय जैन संघटना व जैन समाज हे नेहमीच पाचोर्याच्या कुठल्याही घटना असो तात्काळ मदतीला हजर असतात.मागील भूकंप काळात झालेल्या घटना त्यावेळी सुद्धा भारतीय जैन संघटना व जैन समाजातर्फे मदत करण्यात आली. होती.तसेच कोरोना काळात सुद्धा मुंबईकडून उत्तर प्रदेश बिहार कडे जाणाऱ्या प्रवाश्यांना पाचोरा येथे रेल्वे स्थानकावर त्यांना जेवण केळी,फळफ्रुट देण्यात आले होते.तसेच दोन दिवसांपूर्वी पाचोरा रेल्वे मृत्यू पावलेल्या इसमाच्या नातेवाईकांना ब्लॅंकेट,चादर व नाश्ता,जेवण ची व्यवस्था केली होती. यावेळी भारतीय जैन संघटनाचे पदाधिकारी व जैन समाजाचे भडगाव येथील सुभाषजी राका, रितेश ललवाणी, अजय भंडारी, राजेश जैन, भूषण बांठीया,महावीर जैन, अनुप जैन, नितेश जैन नितीन जैन, लबेश जैन यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे सर्वांना मदत केली. यावेळी भारतीय जैन संघटना व जैन समाजातील सदस्य उपस्थित होते. ह्या आपात्कालीन समयी जैन समाजाकडून माणुसकीचे दर्शन,कळस दिसायला मिळाला
Comments
Post a Comment