शिवप्रताप पुस्तकाचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते प्रकाशन

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
शिवप्रताप पुस्तकाचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते प्रकाशन 
जळगाव -  इतिहास प्रबोधन संस्था ही महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनाहूत इतिहासाचे कार्य प्रकाशित करण्याचे काम करीतअसतात जगातले पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन, जगातील पहिला श्री शिवचरित्र पुष्पांजली हा ग्रंथ, वेद रायगडाचा हा संदर्भ ग्रंथ, शिवप्रताप शिवचरित्रावरील दैनंदिनी असे विविध उपक्रम राबवत याच श्रृंखलेत संस्थेच्या माध्यमातून रवींद्र पाटील आणि भारती साठे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची चिकित्सा करणार आहे शिवप्रताप हे पुस्तक दिनांक 19 जानेवारी  2025 रोजी मालेगांव येथे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.शिवाजी महाराजांच्या जीवना बद्दलच्या इत्म'भूत माहितीचा खजिना म्हणजे शिवराय हे पुस्तकं होय. आजकाल लोकांना  वाचण्यासाठी वेळ नसतो तसेच  विद्यार्थी वर्ग ही मोबाईलमुळे वाचनापासून दूर झाले आहे. विद्यार्थ्यांच्या वाचनाची आवड वाढावी या उद्देशाने तसेच विद्यार्थ्यामध्ये शिवाजी महाराजाची राष्ट्रप्रेरणा व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागविण्यासाठी शिवप्रताप  या पुस्तकाचा उपयोग होईल. या पुस्तकात शिवाजी महाराज किती दिवस जगले, कोणत्या वेळी कुठल्या किल्या वर होते की मोहिमेवर होते यां माहितीचा खजिना म्हणजे शिव प्रताप होय या पुस्तकाबद्दल  माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना शिवव्याख्याते रवींद्र पाटील व भारती साठे यांनी माहिती देऊन त्यांच्या हस्ते पुस्तकं प्रकाशन करण्यात आले. इतिहास प्रबोधन संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असून गड, किल्ले, स्वातंत्र्य सैनिक, स्थानिक अप्रकाशित साहित्य, महाराष्ट्रीय परंपरा, यांची जोपासना करणे, शिवाजी महाराजांचे साहित्य प्रचार व प्रसार करणे या उद्देश्याने कार्य करत असतें 
या पुस्तकं प्रकाशन वेळी इतिहास नितीनदादा पोफळे सरचिटणीस व्यापारी आघाडी भाजपा, आबासाहेब प्रदीप बच्छाव ज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधन संस्थेच्या सचिव सौ भारती साठे , सदस्य प्रा सुरेश कोळी, सुनील साठे , साल्हेर किल्याचे मार्गदर्शक यश भामरे उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद