डिजिटल बोर्डाच्या आताच्या युगातही पूर्वीच्या "हस्त उठावदार पेंटिंग कलेल" ला आज ही तेवढीच पसंती !!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
येथील सुमारे 35 ते 40 वर्षापासून हाताने आपल्या कलेने भिंतीवर केलेली दुकानदारांच्या नावाची पेंटिंग किंवा भिंतीवर केलेली पेंटिंग आजही बऱ्याच भिंतीवर आहे पूर्वी दुकानदार आपल्या नावाचे पेंटिंग करून बोर्ड लावत असे व इलेक्शनच्या काळात भिंतीवर आपले नाव निशाणी भिंतीवर लिहित असे त्यामुळे त्यावेळेस त्या पेंटिंगला खूप महत्त्व होते पण आता डिजिटल युगाचे बोर्ड पेंटिंग चे बोर्ड झाल्यामुळे त्या हाताच्या पेंटिंग चे महत्व कमी होत गेले पण आजही पाचोरा शहरातील श्री लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांनी आपल्या हाताच्या कलेची पेंटिंग जिवंत ठेवून पुन्हा जोमाने पाचोरा शहरात नाहीतर पुणे बारामती नाशिक औरंगाबाद या ठिकाणी त्यांची हाताने पेंटिंग भिंतीवरची आजही करत असून त्यांनी पाचोरा शहरातील कॉलेज परिसरातील असलेल्या भिंतीवर त्यांचे अनेक विषयावर पेंटिंग करत असून तसेच नगरपालिका तर्फे बेटी बचाव बेटी पढाव तसेच झाडे लावा झाडे जगवा अशी अनेक वाक्यरचना टाकून भुयारी मार्गात त्यांनी लोकांना आकर्षित केले असून त्यांच्या पेंटिंग मुळे पाचोरा शहरात पुन्हा पूर्वीचा पेंटिंगचा काळ लोकांना आठवू लागला पूर्वीची हाताने केलेली पेंटिंग आजही उठावदार दिसत असून त्या कलेचे आजही लोकांना आकर्षित वाटत आहे श्री लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांनी आपली कला आजही जोपासली असून अगदी माफक दरात पेंटिंग करत आहे त्यांचा जलसंपर्क दांडगा असून त्या माध्यमातून ते अनेक पेंटिंग चे काम मिळत असे.!
श्री लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांच्या कलेला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्री किशोर भाऊ राय काकडा व उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष श्री भुवनेश दुसाने व सर्व पत्रकार मंडळी यांनी शुभेच्छा दिल्या
Comments
Post a Comment