वरखेडी गृप ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. प्रतिभा संजय पाटील यांची बिनविरोध निवड
वरखेडी ता पाचोरा(वार्ताहार)-: येथील गृप ग्रामपंचायत सदस्य बैठक सरपंच सौ सविता चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या वेळी ठरला प्रमाणे डाॅ धनराज राजेंद्र पाटील यांनी उप सरपंच पदाचा राजीनामा दिला ने रिक्त झालेल्या जागेवर सौ प्रतिभा संजय पाटील यांची उप सरपंच पदी बिन विरोध निवड करण्यात आली
या वेळी सरपंच सौ सविता चंद्रकांत सोनवणे, सदस्य धनराज राजेंद्र पाटील, संजय लक्ष्मण पाटील, योगेश अशोक चौधरी, ज्ञानेश्वर शंकर खोंड, सदस्या सौ अलका धनराज विसपुते, सौ उषाबाई ज्ञानेश्वर सोनार श्रीमती मंगला बाई नाना पाटील,सौ आशाबाई विजय भोई याची उपस्थितीती होती या वेळी ग्राम विकास अधिकारी संतोष शिवणेकर यांनी बैठकीचे कामकाज पाहिले त्याना शेनफडू बोरशे क्लर्क यांनी सहकार्य केले उपसरपंच पदा ची निवड खेळीमेळीच्या वातावरण संपन्न झाली वरील निवडीचे धनराज विसपुते, राकेश पाटील, संजय पाटील, विजय भोई यांच्यासह विविध संस्था चे पदाधिकारी, ग्रामस्थांनी स्वागत केले आहे
Comments
Post a Comment