पाचोरा शहरातील श्री गो.से.हायस्कुल येथे आज पहिल्या "स्री शिक्षिका", "मुख्याध्यापिका",व "समाजसुधारक कवियित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ही "बालिका दिन म्हणून संपन्न.!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था  संचलित श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे आज  भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, समाज सुधारक, कवियत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.
        कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून झाली .
 यावेळी  पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाईंच्या कार्यावर आपल्या शब्दातून मनोगत व्यक्त केले.शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.आर.बी.बोरसे सर यांनी सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानावर आपले मत मांडले.
     याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे पर्यवेक्षक श्री.आर.बी.तडवी सर सौ.ए.आर.गोहिल मॅडम,  ज्येष्ठ शिक्षक श्री.पी.एम. पाटील,सौ.एस.एस.पाटील मॅडम, प्रतिभा पाटील मॅडम उपस्थित होते.
 यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एन.ए.पाटील मॅडम यांनी केले व आभार जी.वाय. पाटील मॅडम यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद