राज्याच्या क्रिडा धोरणांतर्गत नगरविकास विभागातर्फे आयोजित क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत पाचोरा नगरपालिका संघाचे व्हॉलीबॉल, क्रिकेट स्पर्धेत घवघवीत यश!!!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) 
पाचोरा:राज्याच्या क्रीडा धोरणांतर्गत नगरविकास विभागातर्फे आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये पाचोरा  येथील न.पा.च्या संघांनी व्हॉलीबॉल व क्रिकेट स्पर्धेत विजयी मिळवला.

न.पालिका कर्मचाऱ्यांचा कार्याचा ताण कमी होऊन त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे नियोजन जळगावात नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यामधील न.पालिका कर्मचाऱ्यांनी
सहभाग नोंदविला. पाचोरा न.पालिकेचा संघ व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेता तर क्रिकेट स्पर्धेत उपविजेता ठरला. तीन किलोमीटर चालणे स्पर्धेत योगेश रेवेकर यांनी, समूह गायनात दिपक शेजवळ तसेच दिपक खैरे यांनी पहिला क्रमांक पटकावला. चंद्रकांत माळी गोळा फेक स्पर्धेत उपविजेता ठरले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुख्याधिकारी मंगेश देवरे, अभियंता मंगेश माने, लिपीक ललित सोनार यांच्या गीतांनी धम्माल केली. संदीप जगताप यांनी काव्यवाचनामध्ये सहभाग नोंदविला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद