भारतीय मजदूर घरेलु कामगार महासंघ चाळीसगाव येथे हळदी कुंकू चा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
सालाबाजाप्रमाणे भारतीय मजदूर संघ घरेलू कामगारांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात  येतो. सर्व महिला भगिनी एकत्र जमतात एकमेकांचे आचार विचार मिळतात घरेलू कामगार संघ हा काम कामगार महिला भगिनींना शासनाकडून मिळणाऱ्या योजनेच्या संदर्भात माहिती पुरवत असतो तसेच त्यांच्या सुखदुःखात सहभागी असतात ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे पदाधिकारी तसेच समाजसेविका देखील उपस्थित राहतात. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री सदाशिव सोनार प्रदेश उपाध्यक्ष. तसेच भारतीय मजूर संघाचे तालुका अध्यक्ष श्री नारायण जी कुमावत तसेच भारतीय मजदूर संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी. तसेच कार्यकारणी सदस्य आनंद कोळी. उपस्थित होते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या घरेलू कामगार संघाच्या अध्यक्ष संगीता ताई गवळी. भाजपा शहर अध्यक्ष. यांच्या हास्य प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रमुख मान्यवरांनी  आपले मनोगत व्यक्त केले. तसेच घरेलू महिला भगिनींना मार्गदर्शन केले. तसेच घरेलू प्रदेश कार्यकारणी नवनिर्वाचित कार्यकर्त्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली होती.  कार्यकारणी मध्ये आपल्या चाळीसगावच्या घरेलू महिला कार्यकर्ता सौ रत्‍नाबाई पाटील. यांची प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. यांचा देखील फुल गुच्छ देऊन सत्कार  करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचा संघ महिला भगिनींनी सहभाग घेतला होता.
    सौ छायाताई गवळी. सौ रत्‍नाबाई पाटील. सौ निवेदिता पाठक 
शमीम शेख बाली ताई. सौ शितल मराठी. सौ यूगा पाटील. सौ मयुरी खैरनार. 
   या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी पदाधिकारी यांनी अर्थ परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला तसेच अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद