नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय दक्षता समिती चीबैठक संपन्न.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
मा. जिल्हाधिकारी, जळगाव व मा. अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांचे सुचनेनुसार आज दि. 01/01/2025 रोजी दुपारी 03:00 वाजता तहसिलदार पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कुरंगी येथे ग्रामस्तरीय दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीस ग्रामपंचायत कुरंगी येथील सरपंच श्रीमती मंगलाबाई पंढरीनाथ पाटील, उपसरपंच श्री. दिनकर सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री. आबासाहेब पाटील, मंडळ अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती जिज्ञासा पाटील, तत्कालिन ग्राम महसूल अधिकारी श्री. नदीम शेख व ग्रामस्थ कुरंगी उपस्थित होते.तत्कालिन ग्राम महसूल अधिकारी श्री. नदीम शेख यांनी गावक-यांना संबोधित केले. जर नदीतुन वाळू चोरी झाली तर पाण्याची पातळी खालावते तसेच विहीरीचे पाणी कमी होऊन त्याचा फटका गावाला बसतो. त्यामुळे आपण गावक-यांनी प्रशासनास सहकार्य करावे जेणेकरुन जास्तीत जास्त अनधिकृत गौणखनिज कारवाया करता येतील. त्यांनतर योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांनी जळगाव येथील बैठकीत मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आम्ही आज पासुन कुरंगी गावातुन वाळूचा एकही खडा उचलु देणार नाही. याबाबत सर्वाच्या वतीने ग्वाही दिली.सदर बैठकीत तहसिलदार पाचोरा यांनी ग्रामस्थांना संबोधित केले. त्यात त्यांनी ग्रामस्थांना मौजे कुरंगी गावातुन बाळू चोरीस प्रतिबंध करणेकामी प्रशासनास सहकार्य करणेकामी आवाहन केले. तहसिलदार पाचोरा यांनी आपला मोबाईल नंबर सर्वांना सांगितला गावातून अवैध गौणखनिज उत्खनन करतांना आढळुन आल्यास मला या नंबरवर कॉल करण्यास सांगितले. वाळू चोरी रोखणे हे महसूल, पोलीस, परिवहन व ग्रामविकास विभागाची सामुहिक जबाबदारी आहे. प्रशासनाला गावक-यांची मदतीची अपेक्षा आहे. वाळू चोरी मुळे गुन्हेगारी वाढते, सार्वजनिक शांतता भंग पावते, अपघात होतात, विनापरवाना दारुचे प्रमाण / व्यसन वाढत आहे असे दुष्परिणाम होतात असे सांगितले. इकडील कार्यालयाने 123 व्यक्तींना चॅप्टर केसेस च्या नोटीसा दिलेल्या आहेत. आपल्याला अवैध गौणखनिज उत्खनन करणा-या लोकांकडून धमकी दिली जात असेल तर आपल्या केसालाही धक्का लागू देणार नाही अशी ग्वाही तहसिलदार पाचोरा यांनी दिली. कुरंगी गावातुन अवैध गौणखनिज वाहतुक होऊ देणार नाही याची सर्व गावक-यांनी प्रतिज्ञा घेतली.
Comments
Post a Comment