महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार महासंघ. संलग्न भारतीय मजदूर संघ. त्रिवार्षिक अधिवेशन ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे 29 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाले.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार महासंघ. संलग्न भारतीय मजदूर संघ. त्रिवार्षिक अधिवेशन ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे 29 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाले.
त्यात नूतन कार्यकारणी सर्वांमध्ये घोषित करण्यात आली. त्यामध्ये भारतीय माझे संघ जळगाव जिल्हा कार्यकारणी सदस्य सौ. रंजनाताई पाटील. चाळीसगाव. यांची घरेलू कामगार महासंघ प्रदेश सचिव पदी व सौ सोनाली ताई ठाकरे अमळनेर यांची प्रदेश कार्यकारणी सदस्या पदी निवड झाली.
तसेच जळगाव जिल्ह्यातील अधिवेशनासाठी. प्रदेश उपाध्यक्ष भा.म.संघ सदाशिव सोनार .हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर घरेलू कामगार महासंघ सदस्या छायाबाई गवळी. शमीन खलील. शेख रुबीना मुजावर. निवेदिता किशोर पाठक हे देखील अधिवेशन ला उपस्थित होते.
त्रिवार्षिक अधिवेशन मध्ये घरेलू महिलांना येणाऱ्या समस्या अडचणी बाबत काही ठराव करण्यात आले. ठराव क्रमांक 1. घरेलू कामगारांसाठी किमान वेतन जाहीर करा.
2. घरेलू कामगार हे देशाच्या ग्रामीण शहरी निम शहरी आणि महानगरामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात कामं करतात. देशात 50 लाख कामगार असावेत राज्यांत सुमारे 10 लाख घरेलू कामगार असाव्यात असा अंदाज आहे.
३. घरेलू कामगारांना बोनस आणि रजा देण्यात यावे.
४. महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाची पुनर्रचना त्वरित करा आणि विवेक योजनांची अंमलबजावणी तातडीने सुरू करा.
५. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळात लाभार्थ्याची नोंदणीचे वय 75 वर्षे करा तसेच मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सन्मानधन योजनेसाठी वयोमर्यादा 75 वर्षे करा आणि सन्मान धन आणि अन्य लाभ कायमस्वरूपी मंडळामार्फत द्या.
सध्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळात लाभार्थी नोंदणी करतांना . लाभार्थ्याचे वय 58 वर्षापर्यंत मान्य केले जाते. त्यापुढील वयाचे घरेलू कामगार मंडळाचे सदर सभासद होण्यास पात्र राहत नाही. घरेलू कामगार या वर्गात वयाच्या 70 ते 75 वर्षापर्यंत देखील महिला काम करताना दिसतात. त्यामुळे सरकारने महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळात लाभार्थ्याचे नोंदणीचे वय हे 58 वर्षापासून वाढवत 75 वर्षे इतके करावे. असे ठराव करण्यात आले.
अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यांमधून घरेलू पदाधिकारी तसेच प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते.
Comments
Post a Comment