भडगाव महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट 2.0 संपर्क अभियान कार्यशाळा संपन्न

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भडगाव: राज्यात नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2023 - 24 पासून करण्यात येत आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि अमुलाग्र व्यापक बदल होत असताना त्याविषयी जनजागृती आणि सातत्यपूर्ण समुपदेशनाची गरज लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष 2023- 24 मध्ये कनिष्ठ महाविद्यालयातून इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबतच्या सकारात्मक बाबी पोहोचविण्यासाठी शासन निर्णयान्वये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या मार्गदर्शनाखाली आमचेया महाविद्यालयात दि. 23 जानेवारी 2025 ला सकाळी 10 वाजता माननीय प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 स्कूल कनेक्ट 2.0 अभियान कार्यशाळा राबविण्यात आली. आदर्श कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय, लाडकुबाई कनिष्ठ महाविद्यालय आणि अंगलो उर्दू हायस्कूलच्या नवी तेे बारावी पर्यंतच्या 144 विद्यार्थ्यांनी आणि बारा शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
भारताला एकगतिक ज्ञान महाशक्ती बनविण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणकोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेले आहे ते सांगण्यात आले. या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांची अद्वितीय क्षमता वाढविणे, पाठ्यक्रमाची लवचिकता, तर्कशील  विचारशक्ती, बहुभाषिकता, रोजगार क्षमता यामधील दुवा आणि समावेशिता यावर भर देण्यात आलेला आहे ते सांगण्यात आले तसेच नवीन शिक्षण प्रणाली 5+3+3+4  ची प्रणाली सविस्तर समजावून सांगण्यात आली. या कार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरणा चे उद्देश, वैशिष्ट्ये,फायदे, श्रेयान पद्धत, तीन व चार वर्षीय पदवी शिक्षण क्रम, मुख्य व गौण पदवी, शैक्षणिक श्रेयसरचना, मुख्य व गौण विषयांची जनरल, जनरल इलेक्ट्रिव व ओपन इलेक्टिव्ह विषयांची संकल्पना, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम व कौशल्यवर्धन रोजगाराच्या संधी, क्षमता विकास विषय, भारतीय ज्ञान प्रणाली, शाश्वत संस्कृतीसाठी मूल्याधिष्ठित शिक्षण, इंटरनॅशिप, प्रकल्प व सह अभ्यासक्रम यांची उद्दिष्टे आणि फायदे यावर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टीने शासनाने उपलब्ध केलेली साथी अर्थसाह्य योजना, शिष्यवृत्तीचे विविध प्रकार, ऑनलाइन शिक्षण घेण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेले विविध पोर्टल याचेही मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेला संसाधन व्यक्ती म्हणून प्रा. डॉ. एस. डी. भैसे आणि डॉ. डी. ए. मस्की यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन   डॉ. डी. ए. मस्की यांनी केले प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन. एन.  गायकवाड यांनी केले. आभार डॉ. बी. एस. भालेराव यांनी केले या कार्यशाळेला सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद