. सौ.र.ना. देशमुख महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्रा चा या उपक्रमाचे आयोजन...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
अलीकडच्या काळात वाचनापासून दुरावत असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके, वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी १ ते १५ जानेवारी या कालावधीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिलेल्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात सामूहिक वाचन, वाचन संवाद, वाचन कौशल्य कार्यशाळा, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन.एन. गायकवाड यांचा मार्गदर्शना अंतर्गत आयोजित केले जाणार आहेत सोबतच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ डी एम मराठे , समन्वयक प्राध्यापक डॉ एस डी भैसे, ग्रंथपाल रचना गजभिये, मराठी विभाग प्रमुख डॉ ए एम देशमुख, एनएसएस अधिकारी ही कार्यकारिणी समिती असणार आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद