सातगाव आणि परिसराचा विकसित चेहरा निर्माण करणार -आमदार किशोर आप्पा पाटील सातगाव सार्व पिंपरी आणि वाडी शेवाळे येथील प्रचार रॅली ला उदंड प्रतिसाद

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
पाचोरा - भडगाव मतदार संघातील विकासात्मक कामाची घोडदौड पुढच्या टर्ममध्ये देखील कायम ठेवणार आहे. गाव तेथे शिवस्मारक,पाणी पुरवठ्याच्या योजना,गावांतर्गत रस्ते प्रधान्याने पूर्ण करणार असून मी विकासासाठी दत्तक घेतलेले सातगाव डोंगरी आणि परिसरातील सर्व गावांचा विकसित चेहरा निर्माण करू असा आशावाद आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. आज सातगाव डोंगरी सर्वे पिंपरी वाडी शेवाळे या परिसरात त्यांनी प्रचार रॅली पूर्ण केली. प्रसंगी बोलताना त्यांनी हा मनोगत व्यक्त केला. सातगाव येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांनी गावातील सर्व प्रभागात फिरून मतदारांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर सार्वे पिंपरी आणि वाडी शेवाळे येथे मतदारांच्या भेटी घेतल्या.दरम्यान या तीनही गावांमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील व सहकाऱ्यांचे पुष्पवर्षाव करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. असंख्य ठिकाणी माता-भगिनींनी औक्षण करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे,रमेश पाटील, सुनील पाटील, इंदल परदेशी,राहुल पाटील,भगवान पांडे,डॉ शेखर पाटील, डी एन पाटील,नंदू पाटील,दीपक पाटील,आनंद पाटील,हिलाल ओंकार पाटील,आप्पा वाघ,गोकुळ वाघ सागर गायकवाड,भीला पवार सागर चौधरी अमरसिंग परदेशी जावेद हवलदार राजू बोरसे किरण कोठावदे सुनील मराठे सतीश परदेशी अविनाश पाटील सरदार परदेशी उमेश बच्छे, अंकुश गवळी, ईश्वर जाधव,गोकुळ बैरागी रवी पाटील लक्ष्मण डांबरे,विश्वास पांडे,कैलास पांडे,अनिल पाटील,काशिनाथ तडवी,राजू चव्हाण,भैय्या पांडे,नितीन भोसले,वसंत गवळी, रज्जाक तडवी,अमोल बाविस्कर,रमेश पाटील,शांताराम वाघ,दीपक मोरे यांचे सह भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद