आज अपक्ष उमेदवार डॉ. नीलकंठ पाटील यांना प्रचार दौऱ्यात गोंडगाव(भडगाव )येथे उदंडप्रतिसाद, वयोवृद्ध मंडळी तसेच महिला भगिनींनी दिला भरभरून आशीर्वाद दिला.
आज दिनांक ६ नोव्हे.ला अपक्ष उमेदवार डॉ. नीलकंठ पाटील यांना प्रचार दौऱ्यात गोंडगाव(भडगाव )येथे उदंड
प्रतिसाद, वयोवृद्ध मंडळी तसेच महिला भगिनींनी दिला भरभरून आशीर्वाद दिला.
वाक ता.भडगाव येथील प्रगतशील शेतकरी, सरपंच तथा डॉ.नीळकंठ पाटील यांच्या प्रचारार्थ गोंडगाव ता.भडगाव येथे प्रचार रॅली काढण्यात आली.रॅलीला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विधानसभेसाठी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून
त्यांनी प्रचारात प्रत्येक ठिकाणी जोरदार आघाडी घेतली आहे.
डॉ नीळकंठ पाटील यांनी भडगाव तालुक्यातील गोंडगाव या गावात प्रचाराचा श्रीगणेशा हा आधी मारुती मंदिरात मारुती रायांना पुष्पहार घालून आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा झंझावात करण्यात आला तसेच या गावातील महत्वपूर्ण भागात आपल्या प्रचार रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी त्यांनी गावातील वयोवृद्ध मंडळींचा आशिर्वाद घेऊन त्यांची तब्येतीची विचारणा केली.व आपल्या अपक्ष उमेदवारी ची निशाणी बॅट सांगुन मला आपले अमुल्य मत देऊन विधानसभेत विजयाचा षटकार मारण्याचा मताच्या रुपात आशिर्वाद देऊन विजयी करुन द्यावे ही विनंती केली प्रत्येक वर्गाच्या प्रत्यक्ष भेट घेतली.या भेटी दरम्यान डॉ नीलकंठ पाटील यांना गावकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद व आशिर्वाद भरभरून मिळाला. त्यानंतर महत्त्वाच्या सर्व ठिकाणी
डॉ नीळकंठ पाटील यांनी भेटी घेतल्या तसेच
शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद
साधत डॉ नीलकंठ पाटील यांनी दि.४ ऑक्टोबर माघारीच्या दिवशी अधिकृत चिन्ह बॅट मिळाल्यानंतर प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे. त्यांचे आवडीचे चिन्ह बॅट मिळाल्याने या विधानसभेत मी षटकार मारणार असल्याचे डॉ. नीळकंठ पाटील यांनी सांगितले आहे. तसेच या गावातील महिला भगिनीं यांनी अपक्ष उमेदवार डॉ निळकंठ पाटील यांचे औष्ण करुन भरभरून प्रचंड उत्स्फूर्त पणे विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भरभरून आशीर्वाद दिला
Comments
Post a Comment