डमी उमेदवारीमागे आमदार किशोर आप्पाच. अमोल शिंदे यांनी दिले पुरावे

डमी उमेदवारीमागे आमदार किशोर आप्पाच. अमोल शिंदे यांनी दिले पुरावे
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
पाचोरा - येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लोकप्रिय अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांचे मत विभाजन करण्यासाठी अनैतिक खेळी खेळली आहे. अमोल शांताराम शिंदे नावाच्या व्यक्तीचा उमेदवारी अर्ज दाखल केला, नेहमीप्रमाणे धंदे खोटे बोलण्याचे आमदाराने आपल्यावरील हा आरोप फेटाळून लावला. मात्र नाव साम्य असलेल्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत आमदार पुत्रासह, नातेवाईक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असल्याचे पुरावे अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

पाचोरा भडगाव विधानसभेचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार अमोल पंडीतराव शिंदे यांनी काल दिनांक ३ रोजी त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना अमोल शिंदे म्हटले की, आमदार किशोर पाटील यांचा पराभव अटळ आहे. पराभूत मानसिकता त्यांना छळत आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही मिनिटात माझे नाव साम्य असलेल्या अमोल शांताराम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आपण असे केलेच नाही असा बनाव आमदारांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला. यावर प्रति आव्हान देण्यासाठी अमोल शिंदे यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.

नामदार किशोर पाटील हे खरोखरच मर्द असतील तर, त्यांनी माझ्या 4 प्रश्नांचे उत्तर द्यावेत, असे प्रति आव्हान अमोल शिंदे यांनी यावेळी केले.

१) डमी उमेदवार अमोल शिंदे हे घुसर्डी ता. भडगाव येथील रहिवासी आहेत, त्यांच्या फॉर्मवर घुसर्डी किंवा भडगाव तालुक्यातील किंवा त्यांच्या परिचयातील नात्यातील व्यक्ती सूचक म्हणून त्यांना का मिळाला नाही.?

२) त्यांच्या उमेदवारी अर्जावरील सूचक हे पाचोरा शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. त्यातील काही आमदारांचे नातलग व • पक्षाचे पदाधिकारी आहेत. याचे उत्तर आमदारांकडे आहे का.?

३) डमी उमेदवार अमोल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत आमदाराचा स्वीय सहाय्यक राजू पाटील, आमदाराचा जवळचा नातलग समाधान, आमदाराचा शालक एकनाथ पाटील आणि वगैरे मंडळी आमदारांचा नव्हे तर मग, कोणाच्या आदेशाने त्याचा फॉर्म भरताना उपस्थित राहिले.?

४) उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर डमी उमेदवार अमोल शांताराम शिंदे बाला प्रांत ऑफिस मधून अज्ञातस्थळी रवाना करण्याची जबाबदारी स्वतः आमदार पुत्र सुमित किशोर पाटील यांनी आपल्या गाडीतून पार पडली. सामान्य व्यक्तीला प्रवेश नसलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात आमदार पुत्राच्या गाडीला त्यावेळी प्रवेश कसा मिळाला. यावर आमदारांनी जनतेला उत्तर द्यावे.

असे प्रश्न उपस्थित करून अमोल पंडितराव शिंदे यांनी आमदारावर घणाघाती टीका करताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी तरी किशोर पाटलांनी आता बिनशर्त माघार घ्यावी. किशोर पाटलांचा दारुण पराभव अटळ आहे. किमान तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाची मते त्यांना मिळतील, किंबहुना डिपॉजिट सुद्धा जमा होऊ शकते. म्हणून मुख्यमंत्री महोदयांची प्रतिष्ठा राखण्यासाठी आमदारांनी उद्या माघारीच्या शेवटच्या दिवशी जनतेची माफी मागून माघार घ्यावी असा सल्ला अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांना दिला.

याबद्दल तपशीलवार बोलताना अमोल शिंदे म्हटले की, आमदार किशोर पाटील हे या निवडणुकीत्त अत्यंत खालच्या व हिन दजचि राजकारण करीत आहेत. अत्यंत घाणेरड्या राजकीय मानसिकतेमुळे आमदार किशोर पाटील यांचे कडून माझ्या जीविताला धोका होऊ शकतो, किंवा माझ्यावर खालच्या दर्जाचे आरोप आमदार करू शकतात. अशा प्रकारची शक्यता अमोल शिंदे यांनी व्यक्त केली. असे असले तरी दोन्ही तालुक्यातून जनतेचा उदंड प्रतिसाद आणि माता भगिनींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मोठ्या मताधिक्याने मी विजयी होईल असा आत्मविश्वासही अमोल शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद