नांद्रा, कुरंगी, दहिगाव संत, डोकलखेडा, वरसाडे, या गावांमध्ये नानासाहेब प्रताप हरी पाटील यांना प्रचारातून वाढता पाठिंबा**निवडणुकीच्या प्रचारार्थ डॉ. पूनमताई पाटील यांनी घेतली आघाडी नानासाहेबांच्या विजयासाठी ग्रामीण भागातील मतदारांनी तिला उत्स्फूर्त प्रतिसाद


  (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज 
आज दिनांक ९ नोव्हेंबर वार  शनिवार रोजी प्रचाराचा दौरा नांद्रा, कुरंगी, दहिगाव संत, डोकलखेडा, वरसाडे, या गावांना होता. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराची सुरुवात या गावातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेऊन रॅलीचा शुभारंभ  करण्यात आला. नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचाराचा झंजावात  बघावयास मिळाला. यावेळी नांद्रा, कुरंगी, दहिगाव संत, डोकलखेडा, वरसाडे या गावातील स्थानिक कार्यकर्ते बंडु पाटील, शिवाजी पाटील,हेमराज पाटील,मुरलिधर पाटील.,आप्पा धनगर, जितेंद्र धनगर, गोपाल धनगर, दिपक, पाटील.,रविंद्र पाटील.,पवन मोरे ,आकाश कुंभार, चेतन पाटील, प्रशांत पाटील, सोपान पाटील, राजू पाटील, पितांबर पाटील, जितेंद्र पाटील, अनिल पाटील, अनंत परदेशी, जय कोळी, नाना निकम, जितू पाटील, प्रशांत पाटील, बालू निकम. इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रचार रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी संपूर्ण गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती या प्रचार रॅलीतून दिसून आली. गल्लोगल्ली उस्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा दिसून आला. प्रसंगी नानासाहेब प्रताप हरी पाटील यांची निशाणी सप्तकिरणांची पेनाची निप या चिन्हाचा प्रचार व प्रसार घरोघरी जाऊन  संपूर्ण गावात करण्यात आला. यावेळी डॉ. पूनमताई पाटील यांचे घरोघरी औक्षण करण्यात आले. नांद्रा, कुरंगी, दहिगाव संत, डोकलखेडा, वरसाडे, या गावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद  बघावयास मिळाला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद