नवजीवन माध्यमिक विद्यालय पाचोराअविस्मरणीय स्नेह सम्मेलनआज दि.06/11/2024 वार बुधवार

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
नवजीवन माध्यमिक  विद्यालय पाचोरा
अविस्मरणीय स्नेह सम्मेलन
आज दि.06/11/2024 वार बुधवार  विद्यालयातील सन 2004-05 यावर्षीच्या इ 10  वी तील विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर चा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
दिवाळी निमित्त माहेरी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी व दिवाळीत गावात  येणारे माजी विद्यार्थी यांनी एक अप्रतिम स्नेह सम्मेलन घडवून आणला 
कार्यक्रमाच्या  सुरुवातीला शाळेचे  बी.एस.पाटील सर व  इतर गुरुवर्य  यांच्या हस्ते सरस्वतीपुजन व दीपप्रज्वलन करून झाला
 विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंदांचे स्वागत व सत्कार आणि भेट वस्तू देण्यात आली.

उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी  आपली  नाव व कार्यरत असलेले ठिकाण कार्य क्षेत्र याविषयी अल्पपरीचय करुन दिला ,   

शाळा
आठवली की सगळे flashback डोळ्यासमोरून जातात ती मस्ती, ती मजा, तो शिक्षकांचा खाल्लेला मार . मित्र-मैत्रिणींनी सोबत केलेली धमाल सगळं आठवलं की टचकन डोळ्यातून पाणी येत* *अस वाटतं लहान होतो तेच बर होत पण कधीतरी मोठं होईलाच लागतं ना..

 जुन्या शालेय आठवणी व खोड्या व झालेली शिक्षा यांचे कथन केले.
शाळेविषयी व शिक्षकांनी दिलेल्या अनमोल मार्गदर्शन बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सर्व विद्यार्थी सुमारे  20 वर्षानंतर आपल्याच शालेय परीसरात एकत्र आल्याने आपले वर्गमित्रांना भेटले त्यांचा  आनंदाला पारावार नव्हता. 
विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की बाहेरील जगात पाहिल्यावर आम्हाला कळले की  आपली शाळा व शिक्षक हे कधीच professional नव्हते तर त्यांनी आमची  जडणघडण करतांना ज्ञानाबरोबरच संस्कार रुजवण्याचेही कार्य केले .
त्यांच्या शालेय जीवनात  घरची बिकट परिस्थिती , त्यात शाळेची व शिक्षकांची कशी  महत्वपूर्ण भुमिका  होती हे सअश्रू नयनांनी भावनिक शब्दात गौरवोद्गार काढले.
    सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील यशाबद्दल अभिनंदन केले व गावात असणाऱ्या मेहनतीने जीवन जगणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनस्वी कौतुक केले.
असा अद्वितीय कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले व जीवनाविषयी अनमोल मार्गदर्शन केले.
तर शिक्षक वृद  यांनी  सन्मान गुरुजनांचा आणि सोहळा मैत्रीचा  कार्यक्रम खूप छान प्रकारे साजरा केला  त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बी.एस.पाटील सर* होते ,प्रमुख पाहूणे विद्यालयातील उपस्थित सर्व शिक्षक आणि माजी शिक्षक होते 
      सूत्रसंचालन माजी विद्यार्थि  अरुण पुंडलिक जगताप यांनी खूप उकृष्ट प्रकारे केले . 
      कार्यक्रमाची सांगता निसर्ग रम्य परीसरात सवाद्य नृत्य करुन व *सुरुची भोजनाने* झाली 
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझ्या  सर्वच वर्ग मित्र आणि मैत्रिणीनी परीश्रम घेतले. 
            त्यांना मनापासून आभार 

                      शुभेच्छुक
               दिनेश सिताराम मोरे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद