पाचोऱ्यात प्रथमच मिनी IPL आयपिएल धर्तीवर स्पर्धा भरणार, त्याचा फायदा क्रिकेट खेळाडूंना मिळणार ,प्रवेश फक्त ऑनलाईन होणार १९/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्म भरुन घेणे अनिवार्य असेल

(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
अतिभव्य क्रिकेट मैदानावर चांगल्या क्रिकेट खेळाडूंना मिळणार संधी, प्रथमच मिनी IPL धर्तीवर स्पर्धा भरणार असून त्याचा फायदा जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना मिळणार असून प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

पाचोऱ्यातील, नंदू शेलार यांच्या वतीने एन एस क्रिकेट क्लब क्रिकेटच्या मूलभूत गोष्टींबद्दल आणि क्रिकेट सत्रे सुलभ करण्यासाठी काय आवश्यक आहे, ज्यांची परिस्थिती बेताची आहेत म्हणून त्यांचा चांगला खेळ असून ते चमकू शकत नाही अश्या खेळाडूची ओळख निर्माण केली जाते, ते ही मोफत जळगाव जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे म्हणून  प्रथमच मिनी IPL धर्तीवर स्पर्धा भरणार आहेत, आठ लीग असणार असून खेळाडूंचा ओक्शन (लिलाव) होणार असून तरी गाव पातळीवरती क्रिकेट खेळाडूंनी यांचा लाभ मिळावा यासाठी काय नियम व अटी आहेत ते आपण जाणून घेऊ या.. 
१)फॉर्म ऑनलाईन असेल जिल्ह्यातील खेळाडू फॉर्म भरू शकतात फॉर्म फी ४०० रुपये असेल,

२)टूर्नामेंट मध्ये अंडर १४, अंडर १६, अंडर १७ या वयातील खेळाडू सहभाग घेऊ शकतात.

३) खेळाडू चे आधार कार्ड, शाळे चा दाखला, जन्म दाखला व दोन पासपोर्ट फोटो असणे अत्यावश्यक आहे.

४) खेळाडू चे ऑक्शन होईल त्या मध्ये १५ खेळाडुवर बोली लावण्यात येईल ते खेळाडू ७००० मध्ये घेतले जातील.

यात U१९ आणि ओपन वया चे खेळाडू खेळू शकत नाही. एखादी खेळाडू आढळून आला तर त्याला बाद करण्यात येईल.
कॅप्टन साठी जो कोणी इच्छुक असेल, त्याला ७०० रु. फॉर्म भरावा कॅप्टन लक्की ड्रॉ प्रमाणे निघेल कॅप्टन ची बेस्ट प्राईज असेल. (एकूण १५फॉर्म फक्त) नंतर लिंक बंद करण्यात येईल.

ज्या कोणत्या संघाला आपला कॅप्टन ठेवायचा असेल तो तेही करू शकतो.प्लेअर ला दुःखापत झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही बाहेरील ज्या कोणाला टीम घ्यायची असेल त्याने आयोजकांशी संपर्क साधावा,

टूर्नामेंट पाचदिवसा अगोदर ऑक्शन (लिलाव) होईल,

IPL प्रमाणे सर्व नियम असतील

रंगीत किट आयोजकाकडून मिळेल. (टीशर्ट लोवर) कलर कीट आयोजकाकडून मिळेल. (टीशर्ट लोवर)

५)बाहेरुन येणाऱ्या प्लेयर साठी राहण्याची सोय केली जाईल,

सर्व सामने मॅटवर खेळले जातील.

इम्पॅक प्लेअरचा रुल असणार आहे.

६) ९० मिनटाचा खेळ असेल १० मिनटं ब्रेक सामना टाइम नुसार चालेल, मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल त्या मध्ये कोल्ड्रिंक्स व फुट्स दिले जाईल.

७)हंपायर बाहेरील असतील, प्रत्येक संघाला ३ लीग सामने असतील, सर्व सामने व्हाईट बॉल वर असेल.

प्रत्येक संघात १५खेळाडू असतील.

सामना बरोबरी टाय झाल्यास हम्पायर नियमा नुसार सुपर ओव्हर होईल, मॅन V
सर्व सामने व्हाईट बॉल वर असेल.

प्रत्येक संघात १५ खेळाडू राहतील.

सामना बरोबरी टाय झाल्यास हम्पायर नियमा नुसार सुपर ओव्हर होईल, मॅन ऑफ द मॅचः ट्रॉफी बेस्ट सस्टमनः बॅट,

बेस्ट बॉलर :- शूज, वेस्ट विकेट किपर कीपरिंग पॅड गोल्झ,

मॅन ऑफ द सिरीज :- ११००/-रु + ट्रॉफी

शक्य झाल्यास DRS व YouTube Live देखील टाहील.,

८)Live स्कॉरिंग .

बाऊंड्रीवर ओनट चे Banner लावण्यात येणार आहे.

१९/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्म भरुन घेणे. १३०फॉर्म भरुन झाल्या नंतर रेजिस्ट्रेशन लिंक: ^
करण्यात येईल. या नंतर आलेले फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.


९)जे प्लेअर इच्छुक असती त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन लिंकवर जावून भरायचे आहेत

१३० प्लेअर झाल्यास ऑनलाईन फ्रॉम प्रोसेस बंद करण्यात येईल लीलावच्या दिवशी टिम मालक कोच व कॅप्टन समोर टी शर्ट लॉन्च
करण्यात येईल. या नंतर आलेले फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.

जर एखादा प्लेयर अन सोल्ड राहिल्यास आयोजक जबाबदार नाही. ०८/१०/२०२४पासून ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे अर्च नवीन प्लेयरला सुवर्णसंधी आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेणे.

१०)जे प्लेअर इच्छुक असती त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन लिंकवर जावून भरायचे आहेत
आणि कॅप्टन समोर टी शर्ट लॉन्च करण्यात येईल

टीम मध्ये १७ वयोगटामधील ५ मुलं, १६ वयोगटामधील ४ मुल, १४ वयोगटामधील ३मुलं, १२वयोगटामधील ३ हे मुलं टीम मध्ये घेणे अनिवार्य आहे.

विनर टीम ला २१००० रु, रनर टीम ला ११००० रु, ऑरेंज कॅप २१०० रु, पर्पल कॅप २१०० रु रुपये असणार आहे.

या लिग मध्ये ८ टीम साठी ८ कोचेस असणार आहेत जो कोणी कोचेससाठी इच्छुक असेल त्यांनी नंदू शेलार यांच्याशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद