यूनिक Computers चा आनंदाचा क्षण.... 32 वा वर्धापन दिन संपन्न
(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार, सत्य शोध न्युज)
पाचोरा शहरातील युनिक काॅम्पुटर चा 32 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला, एखाद्या आपलं नाविन्य टिकवून 32 व्या वर्षात पूर्ण करायची,ही खरोखरच आनंद देणारी गोष्ट आहे.असाच आपला ताजेपणा टिकवून आज 'युनिक' या संस्थेने 32 वषेॅ पूर्ण केली. युनिक कॉम्पुटर्स च्या माध्यमातून १९९2 मध्ये आपल्या भागातील विद्यार्थ्यासाठी आम्ही संगणक शिक्षणाची चळवळ सुरु केली. अत्याधुनिक संगणक शिक्षणापासून वंचित हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात उच्च दर्जाचे तंत्रज्ञान शिक्षण देण्याचा वसा युनिक ने घेतला असून. व्यवसाय म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थांचे करीयर, आयुष्य घडविणारी संस्था म्हणून युनिकने आपला नावलौकिक बनवला आहे.
हि संस्था संगणक शिक्षणाच्या रोपट्याचा वटव्रुक्ष तर झालीच पण त्याची प्रत्येक पारंबी आज पुन्हा एकदा आपल्या मुल्यांशी, संस्कारांशी इमान राखत या मातीत घट्ट रुजली आहे. या संस्थेचा सर्वेसर्वा मी एकटा नसून या संस्थेशी जोडलेली माझी जिवाभावाची माणसं आहे.याचा मला खूप अभिमान आहे. Hardwork, Passion, Dedication, Perfection ह्या सगळ्या भावना जगत आज युनिक कॉम्प्युटर्स इथपर्यंत पोहोचले आहे,आणि आज Success आणि Satisfaction आमच्याबरोबरंच इतरांनाही देत आहे. कुशल व सक्षम व्यवस्थापन, हा संघटीत प्रयत्नांचा कणा आहे असं मी मानतो. यासाठी सर्वांचे खूप कौतुक आणि अभिनंदन. युनिक संस्था अशीच सगळ्यांच्या आशीर्वादाने यशाचे शिखर गाठेल युनिक सोबत मला कायम जाणवत आले आहे.उत्तम धेय्या बरोबरच ,चांगली माणसं तुमच्या समोर आदर्श निर्माण करतात, चांगलं व्यवस्थापन तुम्हाला उत्तम काम करायला प्रवृत्त करते, तर चांगली लीडरशिप तुमच्या कडून "अशक्य ते शक्य करुन घेते "!
धन्यवाद !!!
*स्वप्निल पाटील (ठाकरे)*
संचालक युनिक कॉम्प्युटर्स,पाचोरा
प्राध्यापक- एम एम कॉलेज,पाचोरा
Comments
Post a Comment