Breaking : वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, नगरदेवळ्यातील धक्कादायक घटना
(नगरदेवळा प्रतिनिधी सोनु परदेशी, सत्य शोध न्युज)
नगरदेवळा (पाचोरा), 18 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून मोठी बातमी समोर आली आहे. नगरदेवळा येथील चुंचाळे शिवारात अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पांडुरंग त्र्यंबक महाजन (वय 65) असे मयत शेतकरी यांचे नाव आहे. पांडुरंग महाजन हे निवृत्त शिक्षक होते. दरम्यान, आज ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले असताना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. तर दुसरीकडे प्रकाश चिंधा महाजन यांच्या शेतातील 1 बैल 2 वासरू देखील वीज कोसळल्याने ठार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा परिसरात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पांडुरंग महाजन हे त्यांच्या चुंचाळे शिवारातील शेतीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. दरम्यान, त्यांचा जागीच मृत्यू झालाय. याबाबतची स्थानिक रहिवाशांनी दिलीय.
बैल व वासरू जागीच ठार -
तसेच नगरदेवळा परिसरात चुंचाळे शिवारात प्रकाश चिंधा महाजन यांच्या शेतातील 1 बैल 2 वासरे वीज कोसळल्याने जागीच ठार झाले आहेत. दरम्यान, नगरदेवळा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे परिसरात विजेचा प्रवाह खंडीत झाला आहे.
Comments
Post a Comment