संगीता अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या माधवी सखी मंचाच्या सदस्य महिलांनी श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदी बाई पांडे निवासी विद्यालयात चक्की आटा मशीन भेट देण्यात आली

(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात आज माता माधवी सखी मंच यांच्या विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते महाराज अग्रसेन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी संगीता ताई अग्रवाल नीताताई अग्रवाल मायाताई पटवारी शीलाताई गिंडोडिया विजय अग्रवाल लक्ष्मीकांत पटवारी राजू  गिंडोडिया हंसाताई मोर ज्योतीताई सावा गोपाल जी अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले(जेष्ठ पत्रकार) तसेच सौ मीनाक्षीताई पांडे श्री प्रदीप जी पांडे आदी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. माता माधवी सखी मंच यांच्याकडून सिंगल फेज तीन एचपी ची आटा चक्की स्वर्गीय कालांदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पुनर्वसन  कार्यासाठी स्नेह भेट देण्यात आली याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या दीर्घायु आरोग्यासाठी व उन्नती प्रगतीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी गायत्री मंत्रांचे उच्चारण करून पित्या प्रभूस प्रार्थना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन शिक्षकांनी केले कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद