काल रामायणकार महामुनी महर्षी वाल्मिकी महाराज जयंती निमित्त शहरातील गिरणा पंपिंग रोडवर एकदंत रेसीडन्सी येथे महर्षी वाल्मिकी महाराज मंदिराचे भूमिपूजन आ.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले
काल रामायणकार महामुनी महर्षी वाल्मिकी महाराज जयंती निमित्त शहरातील गिरणा पंपिंग रोडवर एकदंत रेसीडन्सी येथे महर्षी वाल्मिकी महाराज मंदिराचे भूमिपूजन आ.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले ,*काल रामायणकार महामुनी महर्षी वाल्मिकी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,काल याच शुभमुहूर्तावर गिरणा पंपिंग रोडवर एकदंत रेसीडन्सी येथे महर्षी वाल्मिकी महाराज मंदीराचे भुमीपुजन मा.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.पाचोरा-भडगाव शहर व ग्रामीण भागातील सकल कोळी समाज बांधव व महिला भगिनीं गावागावात महर्षी वाल्मिकी जयंतीची तयारी असतांना भुमीपुजन सोहळा साठी आपली उपस्थिती दिली त्याबद्दल व जे बोलावुन पण आले नाही त्यांचे पण मनापासून धन्यवाद अशीच उपस्थिती द्यावी जेणेकरुन आपले वजन इतरांना समजेल, जयवाल्मिकी , रामायणकार महामुनी महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या पाचोरा शहरातील हे ऐतिहासिक सोहळ्या प्रतिक्षा अनेक वर्षांपासून आदिवासी कोळी समाज बांधवांना होती , यावेळी आ.किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते मंदीराचे श्रीफळ फोडण्यात आले श्रीफळ पण पावलेले निघाले म्हणजेच महर्षी वाल्मिकी महाराज पण तेथे मनापासून विराजमान होणार आहेत,हे त्यांचेच संकेत आहेत,या ऐतिहासिक मंदीराचे भुमीपुजन साठी समाजाचे जेष्ठ मा.पि.के.सोनवणे आम्ही त्यांना आदराने आण्णासाहेब म्हणतो, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष मा किशोर रायसाकडा जी,कोळी महासंघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष सुनील मोरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पाचोरा शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार, म.रा.पत्रकार संघाचे ग्रामीण संघटक सुनील कोळी यांचा पाठपुरावा लाभला. पंचक्रोशीतील सकल कोळी बांधव व महिला भगिनीं पण मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment