शिंपी समाजाचे सुद्धा येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक विकास महामंडळाची घोषणा होणार... मा.ना.गिरीशभाऊ महाजन यांचे शिंपी समाज शिष्टमंडळास ठोस आश्वासन


 (दोंडाईचा प्रतिनिधी पांडुरंग शिंपी)
महाराष्ट्र शासनाने नुकतेच  बाराबलूतेदार समाजातील विविध घटकांसाठी आर्थिक विकास महामंडळ जाहीर केले असून यामध्ये शिंपी समाज वंचित राहिलेला आहे. दि.२७ सप्टेंबर,२०२४ रोजी अ.भा.क्ष. नामदेव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष ॲड.मा.महेशजी ढवळे साहेब याविषयी सतत पाठपुरावा व पुढाकार घेऊन मा.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर केले होते. त्यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या निवासस्थानी आज रविवार दि.६ ऑक्टोबर,२०२४  रोजी जामनेर येथे सकाळी १० वाजता अ.भा.क्ष.  नामदेव महासंघ महासंघ महाराष्ट्र व जळगाव जिल्ह्य़ातील समस्त शिंपी समाजाच्या वतीने  संत नामदेव महाराज शिलाई कडाई बोर्ड आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी चे निवेदन राज्य संघटक मनोज भांडारकर, सौ. कुसुमताई बिरारी, युवा प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद शिंपी, सौ. सविता बोरसे तसेच जिल्ह्य़ातील समाज अध्यक्ष व पदाधिकारी याप्रसंगी अजय शिंपी, डॉ.राम शिंपी, प्रभाकर शिंपी, शरदराव बिरारी, अशोक सोनवणे, संभाजी शिंपी, महेश कापुरे, संजय शिंदे, संतोष चव्हाण, रवींद्र चिखलीकर, प्रमोद संन्याशी, ज्ञानेश्वर शिंपी, पांडूरंग शिंपी, मनोज कापुरे, किरण शिंपी, दत्तात्रय शिंपी, सुनिल नेरपगार यासह असंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. मा.ना. गिरीशजी महाजन यांनी उपस्थित शिष्टमंडळास सविस्तर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून शिंपी समाजाचे आर्थिक विकास महामंडळाविषयी सबंधित विभागांच्या अधिकारी यांच्याशी विचारपूस केली व लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीमध्ये हा निर्णय पारित करण्यात येईल असे ठोस आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले व लगेच दहा मिनिटांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा भाऊंना फोन येऊन येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंपी समाज आर्थिक विकास मंडळ जी आर निघेलच असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित समाजबांधवांच्या वतीने भाऊंचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. तसेच संत नामदेव महाराजांचा गमछा व श्री विठ्ठल रुख्माई ची प्रतिमा भाऊंना सप्रेम भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद