नगरदेवळ्यात पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोन जणांचा बुडून मृत्यू*नगरदेवळा ता.पाचोरा :

(नगरदेवळा प्रतिनिधी सोनुभाऊ परदेशी सत्य शोध न्युज)
अग्नावंती धरणक्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अग्नावंती नदीला दिनांक १४ रोजी मोठा पुर आलेला होता.पाण्याचा अंदाज न आल्याने येथील दोन युवक राजेंद्र गोरख पाटील व रविंद्र प्रभाकर पाटील (निवृत्त बी.एस एफ.जवान) या दोहोंचा पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.सकाळी साधारणतः पाच वाजेपासून हे दोन्ही युवक पाण्याच्या प्रवाहात वाहिले असल्याची प्राथमिक चर्चा होती यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाटील व माजी उपसरपंच सागर पाटील यांनी गावात व परिसरात त्यांचा शोध सुरू केला तसेच स्थानिक औट पोस्टला सुद्धा कळविले.यानंतर दुपारी बारा वाजेच्या सुमारास फरशी जवळ दोघांचे मृतदेह आढळून आले .पाचोरा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद