लोहारा परिसरात परतीच्या पावसाचे थैमान,शेतकरी चिंताग्रस्त.....
(ग्रामीण प्रतिनिधी अनिल तडवी, सत्य शोध न्युज)
लोहारा परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही परतीचा पाऊस सुरू या पावसामुळे कुऱ्हाड बुद्रुक खुर्द सर्कलमधील कुऱ्हाड ,रामेश्वर, लाख म्हसा स, नाईक नगर ,लोहारा कळमसरा ,कासमपुरा ,शहापुरा इ.दिनांक 09/10/2024 24 ला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे व सलग तीन दिवस पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पांढरे सोने ओळख असलेला कापूस/ व कापून ठेवलेला मका सोयाबीन पूर्णपणे पाण्यात भिजल्यामुळे परिसरातील गावा- गावातील, शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात भरून न निघणारे नुकसान झालेले आहेत कुऱ्हाड सर्कलमध्ये अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचे मुख्य पीक कापूस मका सोयाबीन या पिकांवर अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे अनेक तारांबळ उडाली त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत शासनाने त्वरित पंचनामे करून मदत जाहीर करावी व प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी जोर धरत आहे याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकसानीबाबत तक्रारही केली आहे
Comments
Post a Comment