आजचे सर्व शासकीय कामांचे भूमिपूजन, लोकार्पण उद्घाटन कार्यक्रम रद्द -आमदार किशोर आप्पा पाटील...


(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार पाचोरा, सत्य शोध न्युज)
देशातील प्रसिद्ध उद्योगपती *भारतरत्न रतनजी टाटा* यांचे शुक्रवारी  रात्री मुंबई येथे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली असल्याने राज्य शासनाने एक दिवसाचा *शासकीय दुखवटा* जाहीर केला आहे. त्यामुळे आज गुरूवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी होणारे सर्व *शासकीय कामकाजांचे भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत,*
यात प्रामुख्याने गाडगेबाबा नगर येथील रस्त्या कामांचे भूमिपूजन तसेच काकणबर्डी येथे पर्यटन विकास निधीतून साकारलेल्या कामांचे लोकार्पण क्रीडा संकुलाचे भूमिपूजन व कृषी भवन याचे भूमिपूजन या कार्यक्रमांचा समावेश आहे. *सदरील कार्यक्रम उद्या शुक्रवारी  दिनांक 11/10/2024 रोजी दुपारी 4 वाजता  घेण्यात येतील* त्याबाबत सर्वांना माहिती कळविण्यात येईल.
झालेल्या बदलाची कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी ही विनंती. 
आपला 
*किशोर आप्पा पाटील* 
आमदार पाचोरा भडगाव

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद