बांबरुड राणीचे येथेआदरणीय आप्पासाहेब ओंकार वाघ यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
आज डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कैलासवासी लोकनायक आदरणीय आप्पासाहेब ओंकार वाघ यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी पि.टी.सी चे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय भाऊसाहेब श्री. दिलीप वाघ यांनी समाधीवर पुष्प अर्पण करून वंदन केले. त्यानंतर पि.टी सी चेअरमन आदरणीय नानासाहेब संजयजी ओंकार यांनी देखील कैलासवासी आप्पा साहेबांच्या शक्ती स्थळी विनम्र अभिवादन . कार्यक्रमाच्या आरंभी प्राचार्य श्री डी.व्ही.पाटील सर यांनी सर्वांचे शब्द सुमनानी स्वागत केले. या प्रसंगी एम.एम.महाविद्यालये माजी प्राचार्य.श्री बापू.सो.बी.एन.पाटील सर यांची मराठी भाषा कोष साठी निवड करण्यात आली त्यानिमित्त माजी आमदार भाऊ.सो.दिलीप जी वाघ यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी स्कूल कमिटी चेअरमन अण्णासाहेब श्री. दगाजी वाघ, माजी पंचायत समिती सदस्य श्री.भाऊ सो.ललितजी वाघ तसेच,सरपंच ,उपसरपंच, आदरणीय खलील दादा देशमुख तसेच पिटीसी संचालक ,ग्रामपंचायत सदस्य व विविध शाळेतील प्राचार्य, मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.यावेळी माजी आमदार भाऊ सो.दिलीप वाघ यांनी कै. आप्पांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच.श्री खलील दादा व श्री. विकास पाटील सर यांनी देखील यावेळी आपले विचार मांडले.प्राचार्य शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी त्या यशस्वी प्रयत्न केले.या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment