नाशिक येथील सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांचा मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार

(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)

पाचोरा नाशिक येथील सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांच्या कलेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकताच नाशिक येथील एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

नुकताच नाशिक येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या देशातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याच सोहळ्यात सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांच्या कलेची दखल घेत सत्कार करण्यात आला.

सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांच्या कलेची दखल गेल्या काही

दिवसांपूर्वी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व लंडन येथील नामांकित वर्ल्ड बुक संस्थेने घेतली होती.

नुकताच नाशिक शहरातील मुंबई नाका परिसर येथे एका कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह

निजान

नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, विद्यम मान पालकमंत्री दादा भुसे हे पण उपस्थित होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती ऐश्वर्या औसरकर यांनी गत काही दिवसांपूर्वी मोहरीच्या दाण्यावर हुबेहूब रेखाटली होती. त्यांच्या ह्या कलेची दखल "इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने व लंडन येथील नामांकित संस्था वर्ल्ड रेकॉर्ड बुक" या संस्थेने घेत वर्ल्ड चॅम्पियन त्यांच्या कलेला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला. त्याच धर्तीवर ऐश्वर्या औसरकर यांच्या कलेची दखल घेत या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून त्यांच्या कलेचे कौतुक, करून मानसन्मान करण्यात आला. सुक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर ह्या म्हणाले की, हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सुवर्णक्षण व आनंदाचा क्षण असल्याचे  यांनी या वेळी बोलताना सांगितले. आजचा  हा सन्मान आणि पुरस्कार मी माझे आईवडील तसेच भावाला याचे श्रेय देते, असेही औसरकर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद