एस. एस. एम. एम. महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्ता यादीत

(मुख्य संपादक किशोर रायसाकडा)
(पाचोरा दि. 02/10/2024) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आले. त्यात कु. संजिदा बानो शेख दादामिया ही पदव्युत्तर इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी सुवर्णपदक पटकावून विद्यापीठात प्रथम आली. कु. युगंधरा राजेंद्रसिंग परदेशी ही देखील पदव्युत्तर इंग्रजी विभागातून विद्यापीठात दुसरी आली. तर कौस्तुभ राजेंद्रसिंग परदेशी हा साहित्य शाखेचा विद्यार्थी पदवी इंग्रजी विषयात तिसरा आला व कु. नान्सी विकेश पूरसनानी ही वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी विद्यापीठात चौथी आली. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब दिलीप वाघ, चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव मा. श्री. दादासाहेब ॲड. महेश एस. देशमुख, व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक मा. श्री. अण्णासाहेब वासुदेव महाजन, श्री. रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील यांच्या शुभहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल संस्था व महाविद्यालय परिवारातील प्राध्यापक, कार्यालयीन अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद