बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्यांवर दु:खा डोंगर....!पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथील शेतकरी दगा ओंकार डांबरे यांची बैल जोडी व गाडी विहिरीत पडल्याने दोन्ही बैल मरण पावले.बांबरुड राणीचे येथे अत्यंत दुर्दैवी घटना
(जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी सत्य शोध न्युज)
बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्यांवर दु:खा डोंगर....!पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथील शेतकरी दगा ओंकार डांबरे यांची बैल जोडी व गाडी विहिरीत पडल्याने दोन्ही बैल मरण पावले.बांबरुड राणीचे येथे अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या गावातील सर्वसाधारण कुटुंबातील कष्टाळू शेतकरी दगा ओंकार डांबरे यांचे दोघ बैल गाडी सोबत विहिरीमध्ये आज दुपारी पडले त्यात दोघी बैलांचा दुर्देवी अंत झाला शेत शेजारी व गावातील सामाजिक कार्य करणाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच शेतात धाव घेऊन विहितील बैलगाडी शेता जवळील शेतकऱ्यांच्या मदतीने व ट्रॅक्टर व जेसीबी च्या साह्याने वरती काढुन तलाठी पल्लवी वाघ मॅडम यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.व बांबरुड येथील सरकारी पशु वैद्यकीय अधिकारी यांनी पी.एम केले.साधारण परिस्थती असल्या मुळे शेतकरी कुटुंबाला धीर दिला.आता यापुढे सदर शेतकऱ्याची झालेल नुकसान मिळून देण्यास कलेक्टर साहेबानं कडे मागणी करण्यासाठी तलाठी साहेबांनी व गावातील प्रतिष्ठित लोकांनी सहकार्य करावे अशी गावातील सुजाण नागरिकांकडून मागणी होत आहे. यावेळी घटनास्थळी राजु गंव्हाडे,पिंटु बांड,पिनु मोरे,छोटु बडगुजर, बंडु ,भगवान डांबरे,विद्धेश्वर डांबरे,समाधान डांबरे,व इतर शेता जवळील शेतकरी होते.
Comments
Post a Comment