पाचोरा शहरात महर्षी वाल्मिकी महाराज मंदिराचे बांधकाम भूमी पूजन: एक उत्सव,पाचोरा शहराला मिळणारी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे.
पाचोरा शहरात वाल्मिकी मंदिराचे भूमी पूजन: एक उत्सव*
**पाचोरा शहराला मिळणारी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे.* महर्षी वाल्मिकी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आदिवासी कोळी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी मंदिराचे "भूमी पूजन सोहळा हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार असून, हा कार्यक्रम नक्कीच एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. पाचोरा कोळी समाज व पंचक्रोशीतील सकल कोळी समाज हा क्षण कधी संपन्न होईल हे बघण्यासाठी, ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते ती आतुरता डोळ्यांचे पारने फिटणार आहे तो क्षण म्हणजेच १७ आक्टोबर २०२४ गुरुवारी सकाळी ठिक 9:30 वाजता गिरणा पंपिंग रोड समर्थ किराणा दुकान एकदंत रेसीडन्सी पाचोरा येथे संपन्न होत आहे
*या कार्यक्रमाची काही महत्त्वपूर्ण माहिती :*
१७ ऑक्टोबर, सकाळी ९:३० वाजता
गिरणा पपिंग रोड, एकदंत रेसीडन्सी पाचोरा
* **कोण:**समाजाचे जेष्ठ मा. पि.के.सोनवणे(आण्णासाहेब ),आपल्या समाजे जेष्ठ पत्रकार (महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष)मा.किशोर रायसाकडा, कोळी महासंघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष मा.सुनील मोरे, पत्रकार व कोळी समाजाचे पाचोरा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र खैरनार,तसेच पत्रकार व कोळी ग्रामीण संघटक मा.सुनील कोळी रा.बांबरुड यांनी पाचोरा-भडगाव, चाळीसगाव सर्व पंचक्रोशीतील कोळी समाज बांधवांना,व भगिनींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
*या कार्यक्रमाचे महत्त्व:*
*धार्मिक महत्व:*
ऋषी वाल्मिकी हे रामायणचे रचयिता आहेत आणि त्यांचे आयुष्य आणि कर्म आपल्याला प्रेरणा व उर्जा देते या महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या मंदिराच्या बांधकामामुळे पाचोरा शहरात आराध्य दैवत महर्षी वाल्मिकींचा वारसा अधिक दृढ होईल.
*समाजिक एकता:*
या कार्यक्रमामुळे सर्व समाज बांधव एकत्र येतील आणि भातृत्वाची भावना वाढेल.
*शहराचे विकास:*
* एक नवीन मंदिर बांधणे हे शहराच्या विकासाचे लक्षण आहे. हे मंदिर भविष्यात धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनू शकते.
*आपण का उपस्थित राहिले पाहिजे:*
*आपले समाजाचे आराध्य महर्षी वाल्मिकींच्या आदरापोटी
* समाजातील एकतेसाठी
* शहराच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी
*अशा कार्यक्रमांमुळे आपले शहर अधिक समृद्ध आणि सकारात्मक बनते. म्हणून, सर्व पाचोराकर या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले योगदान द्या.*
Comments
Post a Comment