पाचोरा तालुक्यातील नांद्रा सरपंचपदी सौ. कल्पना तावडे

  (जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी )                         
नांद्रा ता. पाचोरा येथील सरपंचपदी सौ.कल्पना तावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सौ. सीमा सूर्यवंशी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी दि. 7 ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात आली.या पदासाठी सौ कल्पना तावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी सौ. वैशाली पाटील यांनी कल्पना तावडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.निवड प्रसंगी माजी सरपंच आशाबाई तावडे, सीमा सुर्यवंशी, उपसरपंच शिवाजी तावडे,सदस्य अनिल खैरनार, योगेश सुर्यवंशी,ललिता सोनवणे, निर्मला पिंपळे, सुनीता, बाविस्कर, रेखाबाई पाटील सह माजी सरपंच सुभाष तावडे, विनोद तावडे, बालू सुर्यवंशी, अमोल सुर्यवंशी, दिलीप सोनवणे, विनोद बाविस्कर, राजु जाधव, पंकज बाविस्कर प्रा. यशवंत पवार, युवराज सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, गुलाब बाविस्कर,भाऊसाहेब पाटील,पिंटू शिंपी, जिभु सातपुते,भिका कौतिक,कुणाल पाटील पत्रकार राजेंद्र पाटील, पोलीस पाटील किरण तावडे ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप तावडे, संजय बाविस्कर, मोनू बाविस्कर व ग्रामस्थ हजर होते. निवडणूक प्रक्रियाकामी ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. सत्रे, तलाठी नदीम शेख,जिज्ञासा पाटील(कुरंगी) यांनी काम पाहिले.नवनियुक्त सरपंचाचा सत्कार मा. पंचायत समिती सभापती श्री. नितीन तावडे यांनी केला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद