बांबरुड जिल्हा परिषद शाळेत चित्र रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न ...
(जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी,सत्य शोध न्युज)
दि.५ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांबरुड येथे ग्रामविकास फाउंडेशन आयोजीत कै.कैलास रामकृष्ण तावडे यांच्या स्मरणार्थ श्री. नितीन तावडे यांनी चित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रसंगी सर्वप्रथम सरस्वती प्रतिमेचे पुजन पंचायत समिती सदस्य मा. ललीत भैय्या वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी बुऱ्हाण तडवी , उपसरपंच प्रदीप वाघ इ. मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत 248 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब पवार, शिक्षक श्री.सुभाष जगताप,श्री. प्रशांत गवळी, श्री.सचीन सोनवणे, श्री. किशोर महाजन,श्री. भटूकांत चौधरी,श्री. ज्ञानेश्वर मनोरे,श्री अनिल बेलदार, श्री.राकेश धायबर श्रीमती.गायत्री जैन श्रीमती रूपाली चौधरी मॅडम रंजना पवार, श्री.प्रविण सोनकुळ श्री महेश गवादे यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment