अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव विभाग तर्फे आयोजित जनजाती गौरव यात्रा या यात्रेचा 6 वा दिवस
(कजगाव ग्रामीण प्रतिनिधी प्रल्हाद उर्फ अप्पासाहेब पवार)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव विभाग तर्फे आयोजित जनजाती गौरव यात्रा या यात्रेचा 6 वा दिवस तांदुळवाडी गावामध्ये होता
यावेळी तांदुळवाडी गावातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले तसेच गावामध्ये कार्यक्रम घेण्यात आला आणि प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितीत मान्यवर श्री धनंजय शेरकर विभाग संघटन मंत्री, जिल्हा संयोजक तेजस पाटील, यात्रा प्रमुख आदित्य जाधव , गावातील सरपंच दादाभाऊ वेडू पाटील, माजी सरपंच नकुल पाटील गावातील तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत नारायण पाटील विकास सोसायटी चेअरमन संतोष काशिनाथ पवार. युवराज यादव पवार. साहेबराव भिवसन संजय किसन पाटील, समाधान मधुकर पाटील, भीमराव सोनवणे, विनोद पाटील, भूषण पवार,आदि मान्यवर उपस्थित होते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी जळगाव विभाग संघटन मंत्री धनंजयजी शेरकर यांनी जनजाती समाजाविषयी माहिती दिली व त्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा करण्यात आला आणि आदित्य जाधव यांनी आभार मानले
Comments
Post a Comment