चला,...चला,,, चला.... सामनेर (पाचोरा)येथे "नवरात्रोत्सव 2024" निमित्ताने येत्या 4आक्टो.शुक्रवार रोजी(संध्या .8:00 ते रात्री 11:00)माजी आमदार दिलीप भाऊ वाघ युवा फाऊंडेशन मार्फत कानबाई उत्सव,,, पंचक्रोशीतील महिला-भगिनींना येण्याचे आवाहन व निमंत्रण

   (जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी)
पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे "नवरात्रोत्सव 2024' भव्य मंगलमय वातावरणाच्या निमित्ताने माजी आमदार दिलीप भाऊ वाघ  युवा फाऊंडेशन मार्फत महिला भगिनीं चा आवडता कानबाई मातेचा कार्यक्रम  करण्याचे नियोजन केले आहे,येत्या शुक्रवारी संध्याकाळी 8:00  ते रात्री 11:00 वाजेपर्यंत सामनेर तालुका पाचोरा येथे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ  युवा फाउंडेशन तर्फे   सामनेर येथे आयोजित करण्यात आला आहे हाच कानबाई मातेचा कार्यक्रम गेल्या गणेशोत्सव मध्ये पाचोरा शहरात माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या निवासस्थाना जवळ माजी आमदार दिलीप भाऊ वाघ युवा फाऊंडेशन मार्फत आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाला महिला भगिनीं ची जंम्बो,प्रचंड उपस्थिती बघुनच सामनेर येथे नवरात्रोत्सव मध्ये करण्याच नियोजन केले आहे.   कानबाई फ्रेंड सर्कल धुळे व कानबाई सप्तशृंगी मातेच्या गाण्याचा धमाकेदार कार्यक्रमाची रंगतदार सुरुवात गायक सागर देशमुख ,दिलीप बाशिंगे, दिनेश बाशिंगे यांच्या  मधुर आवाजाने होणार आहे. तसेच हा कार्यक्रम माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व पि.टी.सी. चेअरमन (शिक्षण महर्षी)मा.संजय नाना वाघ यांच्या उपस्थितीमध्ये हा कानबाई चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालय सामनेर येथे आयोजित करण्यात आला असून आजूबाजूच्या पंचक्रोशीतील महिला-भगिनींना,बंधु, ग्रामस्थांना सुद्धा या कानबाई कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे  आवाहनासह विनंती केली आहे माजी पंचायत समिती सदस्य मा.ललित वाघ व पाचोरा नगरपालिका नगरसेवक मा.भूषण वाघ यांनी पण सर्वांना येण्याचे आव्हान व आपली उपस्थित ची विनंती केली आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद