सालाबादप्रमाणे यंदा ही रामायणाचार्य महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सवासोबत महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी जमात एकता मंच नाशिक तर्फे पुरस्कार 2024 सोहळा संपन्न होत आहे,,,, मा.युवराज सैंदाणे "कोळी समाज गौरव 2024" पुरस्काराने सन्मानित
जय वाल्मीकी, हर हर महादेव, जय राघोजी...
सर्व समाज बांधावांना कळविण्यात आनंद वाटतो की, सालाबाद प्रमाणे या वर्षीही आपल्या समाजाचे आराध्यदैवत, *रामायणाचार्य महर्षी वाल्मिक ऋषी* जयंती उत्सव साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्र आदिवासी कोळी जमात एकता मंच नाशिक तर्फे दिला जाणारा *पुरस्कार 2024* सोहळा कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आहे. तरी या वर्षी पदाधिकारींनी आणि निवड समिती यांनी सुचवलेल्या पुरस्कारार्थींचे नावे 1) *सन्मान स्वकर्तृत्वाचा 2024* हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना पदाधिकारी श्री.शरद (बंटी कोळी) कोळी. 2) *कोळी समाज गौरव 2024* हा पुरस्कार समाजाचे जेष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे पदाधिकारी श्री युवराज सैंदाणे यांना देण्यात येणार आहे. तरी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की दिनांक 17/ 10 / 2024 गुरुवारी सकाळी ठिक 10.00 वाजता *महर्षी वाल्मिक ऋषी मंदिर,* श्रमिकनगर सातपूर नाशिक. येथे उपस्थीत राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आयोजकांमार्फत विनंती करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment