पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सु.भा.पाटील प्राथमिक विद्या मंदिर (सकाळ सत्र) शिक्षण दिन उत्साहात साजरा!
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु. भा .पाटील प्राथमिक विद्या मंदिरात (सकाळ स्तर) आज ५-९-२०२४ गुरुवार रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थात सर्व शिक्षकांच्या कर्तृत्वाच्या सन्मान करण्याचा दिवस म्हणजेच *शिक्षक दिन* हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान शाळेच्या शिक्षिका श्रीमती वर्षा पाटील मॅडम यांनी स्वीकारले. अध्यक्षांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
त्यानंतर सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले. तदनंतर सुरुवात झाली ती विद्यार्थ्यांच्या तडफदार भाषणांना.....! विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून शिक्षकांविषयी आदरभाव, स्नेहभाव , कृतज्ञता ....इ.अगदी अस्खलितपणे व्यक्त केले.
यानंतर अध्यक्षीय भाषणात श्रीमती वर्षा पाटील मॅडम यांनी अत्यंत सहज व सोप्या शब्दांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या ,*"जर तुम्हाला शिक्षकांप्रती आदर व्यक्त करायचा असेल आणि खरोखर तुम्हाला शिक्षकांचे ऋण फेडायचे असतील तर,चांगल्या सवयींचे पालन करा,आणि आदर्श माणूस होऊन जगा."*
कार्यक्रर्माचे सूत्रसंचलन श्री रवींद्र महाले सर यांनी केले .तर आभार प्रदर्शन श्री ईश्र्वर पाटील सर यांनी केले.
Comments
Post a Comment