नुकत्याच आगीत सर्व घर जळुन खाक झालेल्या गरीब पीडीत कुटुंबाच्या पाल्यांना पाचोरा तहसीलदार मा.बनसोडे साहेब यांच्याकडून शालेयपयोगी साहित्याची मदत सह घरकुल उपलब्ध करून देण्याचे ही दिले आश्वासन....*या गरीब कुटुंबाला काहीना काही सहकार्य मिळावे हे स्थानिक पत्रकार (जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) सुनील कोळी यांचे अथक प्रयत्न!!

    (जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी )पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे हे येथील रहिवाशी गणेश वना कोळी वय 40 (रा. बांबरुड राणीचे)यांच्या घराला10/9/2024 रोजी मध्यरात्री शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने त्यांचे अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू साहित्य पूर्णपणे जळून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  तसेच त्यांचे दोन लहान मुले असून एक मुलगा आठवीत तर एक मुलगी दहावीत  यांचेही शालेय गणवेश शालेय साहित्य पुस्तक व वह्या इत्यादी वस्तू आगीमध्ये मध्ये जळून नुकसान झाले आहे. 
  याचा पंचनामा तेथील तलाठी वाघ मॅडम यांनी केला असून तसा रिपोर्ट तहसीलदार पाचोरा यांना सादर केला आहे. घटनेतील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची व बिकट असून त्यांचा जीवन उदरनिर्वाह हा रोजंदारीवर चालू आहे.  माननीय तहसीलदार पाचोरा विजय बनसोडे यांनी त्या कुटुंबीयांच्या दोघे  मुलांना शाळेचा गणवेश व शालेय साहित्य बॅग पुस्तक वगैरे इत्यादी तात्काळ मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. मा. तहसीलदार  विजय बनसोडे साहेब ही सर्वसामान्य परिस्थितीतूनच पुढे आले असल्याने त्यांनी  या घटनेमुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून स्वतःप्रत्यक्ष रा.बांबरुड येऊन त्या मुलाला व त्या मुलीला शालेय साहित्य  वितरीत केले. तसेच अजून  इतर काही सुविधा पुरवता येईल का?  याचीही चौकशी केली. तसेच त्यांचे घरकुल यादी मध्ये नाव असून त्यांना घरकुल मिळावे या बाबत शिफारस करणार आहे.व  लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत मिळून देण्यात येईल. असे तहसीलदार मा विजय बनसोडे साहेब पाचोरा यांनी सांगितले. घटनेच्या स्थळी तहसीलदार विजय बनसोडे साहेब, तलाठी दिपक दवंगे तलाठी सौ.पल्लवी वाघ,  कोतवाल कुंभार ग्रामस्थ व पोलीस पाटील तसेच  इ.उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद