पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार साहेब यांनी केले महिला पोलीस पोलीस कर्मचारी यांचे एक छेडछाड पथक.!
महाराष्ट्र राज्यात सध्या घडत असलेल्या मुलींच्या घटना संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब पाचोरा विभाग डि वाय एस पी यांच्या आदेशानुसार पाचोरा पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांनी मुलींची छेडछाड होऊ नये याकरिता चर्चा महिला पोलीस उप पोलीस कर्मचारी यांचे छेडछाड पथक तयार करून हे पथक रोज सकाळी कॉलेज शाळा व त्या परिसरात जात असत या पथकांनी प्रत्येक शाळेला आपली हजेरी लावून प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व शिपाई यांना सूचना दिल्या की बिना आय कार्ड चे विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये तसेच बाहेरील कोणी विद्यार्थी शाळा आवारात दिसल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनाही त्यांनी सूचना दिले कुठे काही शंका व अडचणी असल्यास संबंधित पाचोरा पोलीस स्टेशनला कळवावे किंवा प्राचार्य मुख्याध्यापक यांना कळवावे तसेच मोटरसायकल असल्यास बिना नंबर बिना कागदपत्र आणूनही ट्रिपल सीट गाडीवर बसू नये पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलिसगिरी श्री अशोक पवार साहेबांनी छेडछाड पथक तयार केले असून या पथकात शारदाताई भावसार श्री अशोक हटकर श्री रणजीत पाटील श्री योगेश पाटील श्री राहुल शिंपी श्री सुनील पाटील श्री समीर पाटील श्री अशोक पाटील यांची नियुक्ती केलेली असून हे छेडछाड पथक रोज कॉलेज व शाळा यांना भेट देऊन संपूर्ण माहिती घेत असतात या नियुक्ती बद्दल शाळा कॉलेजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
Comments
Post a Comment