स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडून ८/९/२०२४ रोजी तपाचोरा तालुक्यातील अवैध गावठी दारू बनविण्याच्या भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या...!

(पाचोरा)मा.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, यांनी जिल्ह्यात सध्या अवैध गावठी दारु बनविण्याच्या भट्टयामध्ये वाढ होत असल्याने त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश मा.श्री बबन आव्हाड,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले. त्यावरुन मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोह लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

वर नमुद पथकास गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी शिवरात सुपडु तडवी व गाळण बु शिवरात अमोल जाधव हे बाबुळ जंगल भागात गा.ह.भ.ची भट्टी लावून दारू गाळीत आहे अशी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली होती. त्यावर सदरची बातमी मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना कळविल्याने त्यांनी सदर भागात जावून बातमीची खात्री करून पुढील योग्य ती कारवाई करा आदेश दिल्या वरून वर नमुद पथकाने सदर ठिकाणी जावून बातमीची खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकला असता घटनास्थळी सातगाव डोंगरी ता.पाचोरा शिवारात आरोपी नामे सुपडु रहेमान तडवी यांचे कडून ५४४४०/- रु. किंमतीचे गावठी दारु बनविण्याचे साधनासह रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू रोख रुपये असे जप्त करून त्याबाबत पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.ला CCTNS NO २३१/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सदर पथकाने गाळण बु ता.पाचोरा शिवरात घटनास्थळी जावून खात्री करून आरोपी अमोल राजेंद्र जाधव रा. पाचोरा यांचे कडून ८०७५०/- रु. किंमतीचे गावठी दारु बनविण्याचे साधनासह रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू रोख रुपये असे जप्त करून त्याबाबत नगरदेवळा ऑटपोस्ट ला गुरनं १७/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा.धनंजय येरुळे, उप विभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद