पाचोरा शहरातील कृष्ण पुरी भागातील जय हिंद मंडळ यांची पन्नास वर्षांपासूनची असलेली परंपरा व महाराष्ट्रातील तरुणांमधील उत्साह वाढवणारा लेझीम खेळ याची परंपरा आजही सुरू
पाचोरा प्रतिनिधी:- अनिल आबा येवले
महाराष्ट्रातील सर्वच तरुणांचा तसेच मुंबईतील मराठी तरुणांचा खेळ म्हणजेच लेझीम लेझीम प्रथाही महाराष्ट्रात फार पूर्वीपासून चालू असून मुंबईमध्ये प्रत्येक सणांमध्ये विशेष करून गणपती मिरवणूक नवरात्र मिरवणूक उत्साह यांच्या मिरवणूक मध्ये लेझीम चे पथक भाग घेऊन सर्वांचे लक्ष वेध घेत असतात अशीच परंपरा पाचोरा शहरात गेल्या कित्येक वर्षापासून कृष्णा पुरी भागातील तरुण उत्साहाने मिरवणुकीत लेझीम खेळून नागरिकांचे मन लक्ष केंद्रित करीत असतात आता या खेळामध्ये तरुण मुलं मुली सुद्धा भाग घेतात तसेच प्रत्येक शाळेतील मुली मुलं लेझीम मध्ये भाग घेऊन लेझीम चा आनंद घेत असतात लेझीम चा खेळ हा कृष्ण पुरी भागातील तरुण अनेक मुला मुलींना शिकवत असतात लेझीम मुळे कृष्णापुरी भागातील नागरिक उत्साहाने भाग घेऊन आनंद व्यक्त करतात त्यामुळे कृष्णापुरी भागातील ही गेल्या पन्नास वर्षापासून लेझीमची प्रथा सुरू असून आजही सुरू आहे
Comments
Post a Comment