दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी बांबरुड (राणीचे) ता. पाचोरा जि. जळगाव येथे प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संघटनेची कार्यकारणी जाहीर केली.
बांबरुड राणीचे येथे दिव्यांग बांधवांच्या खूप साऱ्या समस्या असून ग्रामपंचायत सऱ्हास पणे दुर्लक्ष करत आहे कोणत्याही दिव्यांगाला कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक लाभ किंवा सार्वजनिक लाभ दिला जात नाही तसेच कोणत्याही प्रकारच्या योजनांचा लाभ दिव्यांगापर्यंत पोहोचवला नसल्याने दिव्यांग बांधव यांनी प्रहार संघटना पाचोरा तालुका प्रमुख महेश निलगु गोंड साहेब यांना संपर्क साधून त्यांना आज रोजी सभा घेण्याचे सांगितले तरी त्यांनी राज्य सरकार केंद्र सरकारच्या विविध योजना दिव्यांग बांधवांना समजावून सांगितल्या तरी गावाचे ग्रामसेवक बबन स्वरूपचंद पाटील यांना सभे विषयी पूर्वसूचना देऊन ह्या सभेला उपस्थित राहणे आवश्यक होते, परंतु त्यांचा फोन स्विच ऑफ असल्याने त्यांच्या कडून प्रत्युत्तर आले नाही त्या विषयी तालुका प्रमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच गावातील जमलेले दिव्यांग बांधव यांच्या आवाजी बहुमताने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सल्लागार तसेच खजिनदार आणि सदस्य यांची निवड करून प्रहार दिव्यांग संघटना साठी कार्यकारिणी जाहीर केली.
अध्यक्ष विजय श्रीराम पवार, उपाध्यक्ष राजू अर्जुन निकम, सचिव संग्राम पुंडलिकराव आढाव, सह सचिव चि. अविनाश भास्कर दारकोंडे सल्लागारपदी माधव रामदास सोनवणे (सर), खजिनदार ,सचिन लखू काळे सदस्य सचिन ज्ञानेश्वर गोराडे, राजेंद्र मधुकर वाणी,फारुख गफुर मेवाती यांची निवड करण्यात आलेली असून दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी शाखेचे उद्घाटन करण्याचे ठरवले आहे. तसेच गावातील दिव्यांग बांधव आणि भगिनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात उप सरपंच प्रदीप प्रतापराव वाघ, बुन्हाण मन्सूर तडवी, गुलाब भिकन तडवी, सांडू बाबूलाल तडवी, प्रदीप अशोकराव आढाव, श्री शिवाजी रामराव वाघ श्री. जितेंद्र नथू साळुंखे, श्री. संचलाल किसन दारकोंडे, विलास बारकू वाघ, श्री. साहेबराव उत्तम बडगुजर, विकी यशवंतराव आढाव, भिकन रमजान तडवी, तनवीर रशीद तडवी, रमेश गिरधर जोडगन, राजेंद्र रामदास पवार, मंगल यादव मेहरे, सौ. मनीषा सुनील पवार आणि पत्रकार बंधू. श्री. सुनील कोळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment