पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे १०/९/२०२४ रोजी शाॅर्टसर्किट होऊन जीवनावश्यक वस्तू जळुन खाक होऊन गरीब कुटुंब हवालदिल....

पाचो-या तालुक्यातील बांबरुड राणीचे येथे 10/9/2024 मंगळवार रोजी रात्री १०:०० वाजता  गरीब हलाखीच्या परिस्थितीतून आपला उदरनिर्वाह करुन संसाराचा गाडा ओढणारा मजूर गणेश वना कोळी यांच्या घराला विद्युत शॉर्टसर्किटमुळे घरामध्ये आग लागली त्या आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तू टीव्ही पंखा ,कपडे मुलांचे वह्या पुस्तके व इतर सामान जळून खाक झाले. तसेच त्यांची मुलगी दहावीला आहे त्या मुलीचे पुस्तक वह्या कपडे जळून खाक झाले असून मुलीचे अश्रू अनावर झाले होते गणेश भाऊ कोळी यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे त्यात अशी घटना घडली म्हणजे जणू त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांची परिस्थिती अजून अत्यंत बिकट झालेली आहे अशावेळी गावातील, ग्रामस्थ  तसेच तलाठी कार्यालयातून घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला अशा परिस्थितीत त्याला शासनाकडून काही ना काही मदत मिळावी याकरिता तो मजूर शासनाकडे मागणी करत आहे, शाॅर्टसर्किट मुळे आपल्याला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल या आशेने तो शासनाकडे बघत आहे,तरी गावातील ग्रामस्थ मध्ये बोलले जात  की सत्य परिस्थिती बघुन त्या गरीब कुटुंबाला शासनाकडुन काहीनाकाही सहकार्य लाभेल

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद