मोंढाळा(पाचोरा) येथे जि.प‌.शाळेत शिक्षक दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, चिमुकले विद्यार्थी बनले शिक्षक...!

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती संपूर्ण भारतात शिक्षक दिन दिनाच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते. मोंढाळे जि.प. शाळेतही ती साजरी करण्यात आली. 
या प्रसंगी इयत्ता 6 वी व 7 वीच्या विद्यार्थ्यांनी शालेय कामकाज सांभाळले. सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्षपणे शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी अध्यापन कार्याला सुरुवात करण्यात केली. मुख्याध्यापकाची भुमिका चि. देवेंद्र वाघ याने पार पाडली, तर
शिक्षक व शिक्षिका म्हणून तब्बल 20 विद्यार्थ्यांनी विविध विषयांच्या शिक्षकांची भुमिका पार पाडली. त्यानंतर सर्व शिक्षक विद्यार्थांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. शिक्षक म्हणून कसे वाटले ? असा
प्रश्न विचारला असता प्रत्येकाने आपआपले वेगवेगळे अनुभव सांगितले. 
सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री.अरुण पाटील ,श्री.व्यंकट बोरसे, श्री.सुरेश पाटील, श्री.राजेंद्र कोळी, श्री.भागवत कोरे, श्रीमती.प्रतिभा पाटील, श्रीमती.उल्का जोशी व श्री.रवींद्र कुंभार सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद