*बांबरुड जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन साजरा* (विद्यार्थी झाले शिक्षक, एक दिवस केले अध्यापन)

पाचोरा ✍️ प्रतिनीधी .५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांबरुड येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

 


जयंती म्हणजेच शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी इयत्ता ४थी च्या विद्यार्थ्यांनी शालेय कामकाज सांभाळले.सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व त्यानंतर प्रत्येक्ष अध्यापन कार्याला सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापकाची भुमिका चि.चैतन्य पवार याने पार पाडली,तर शिक्षक व शिक्षिका म्हणून तब्बल 44 विद्यार्थ्यांनी विविध विषयांच्या शिक्षकांची  भुमिका पार पाडली.त्यानंतर सर्व शिक्षक विद्यार्थांना गुलाबाचे फुल व दुध देण्यात आले.शिक्षक म्हणून कसे वाटले?असा प्रश्न विचारला असता प्रत्येकाने आपआपले वेगवेगळे अनुभव सांगितले. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब पवार, शिक्षक श्री.सुभाष जगताप,श्री. प्रशांत गवळी, श्री.सचीन सोनवणे, श्री. किशोर महाजन,श्री. भटूकांत चौधरी,श्री. ज्ञानेश्वर मनोरे,श्री अनिल बेलदार, श्री.राकेश धायबर श्रीमती.गायत्री जैन श्रीमती रूपाली चौधरी मॅडम श्री.प्रविण सोनकुळ श्री महेश गवादे यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद