तांदुळवाडी वडाळा- वडाळी रस्त्यावरील रेल्वेचा बोगदा सुरू न झाल्यास आमरण उपोषण करू.....

(कजगाव ग्रामीण प्रतिनिधी प्रल्हाद उर्फ अप्पासाहेब पवार)
 
  तांदुळवाडी वडाळा मार्गावरील साधारणता 20 ते 25 गावांचा संपर्क तुटल्याने शेतकऱ्यांचे व विद्यार्थी वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. वडाळा हे गाव मातृभूमीसाठी लढणारे देशाला अहो ती देणारे त्याच बलाढ्य गावाला स्वातंत्र्य नसून ब्रिटिश च्या पारतंत्र मध्ये दिसून येत आहे तांदुळवाडी येथील गेल्या 45 ते 50 दिवसापासून भुसावल ते नाशिक तिसऱ्या रेल्वे लाईन काम सुरू असून शेतकरी राजाचा सोन्यासारखा माल शेतातून आणण्यासाठी रेल्वे बोगदाचा 50 दिवसापासून संपर्क तुटल्याने रेल्वे पटरी ओलांडून येणे जाणे करावा लागत असते, त्याचप्रमाणे मळगाव येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी तांदळवाडी माध्यमिक विद्यालयाची स्कूल बस रेल्वे बोगद्याचे काम चालू असल्याने येणेदेखील शक्य नसल्याकारणाने विद्यार्थ्यां वर्गांचे अतोनात नुकसान होत आहे,
मळगाव येथील  ७०/८० विद्यार्थ्यांना दररोज रेल्वे पटरी ओलांडून जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. 45 ते 50 दिवसापासून शेतकऱ्यांना माल आणणे, गुर ढोरे आणि सध्या सोन्यासारख्या कापसाला शेतातून आणताना या रेल्वे बोगदाचा मोठा अडथळा असल्याने शेतकरी वर्गाला आठ ते दहा किलोमीटर फिरून व अशा काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात परिसरात वारंवार होणारा पावसामुळे परिसरातील पूर्ण शेती ओलाव्या खाली आल्याने शेतकरी राजा अशा संकटांना सामोरे जाऊन त्याला कधी न्याय मिळेल. हा न्याय देणारा राजा केव्हा जागृत होईल? या सर्व विषयास अनुसरून मध्य रेल्वेची लाईन चालू असल्याने गेट क्रमांक 124 बंद करून भुयारी मार्ग बांधण्यात आलेल्या आहे तरी भुसावळ डी आर यम यांनी जागेची व प्रवासी धारकांना येणाऱ्या अडचणी संपर्क साधून तसेच नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ या परिसरातील शेतकऱ्यांच्या व  विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून पर्यायी मार्गासाठी न्याय मिळवून द्यावे  अशी अपेक्षा परिसरातून होत आहे.
*** मनोगत***
मोजे तांदूळवाडी वडाळा रस्त्यावरील रेल्वे बोगदा रहदारी सुरू करण्यासाठी आमच्या जवळील जिवाभावाचे दहा गावांनी मिळून डी आर एम ऑफिस भुसावळ मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव मा. उपविभागीय अधिकारी पाचोरा,मा. तहसील कार्यालय भडगाव ठरावच्या नक्कल देऊन आम्हा ग्रामस्थांना आठ दिवसाच्या कालावधीमध्ये न्याय मिळाला नाहीस तर ....
माजी सरपंच. सिताराम पवार 
सरपंच. वच्छला ताई पाटील तांदूळवाडी 
  शेतकऱ्यांचे मनोगत
जून 2024 पासून रेल्वेच्या तिसऱ्या मार्गाचे काम सुरू असून बोगद्यामध्ये आठ ते दहा फूट पाणी साचल्याने वरून रेल्वे पटरीतून ये जा करावा लागत असे. तरी रेल्वे प्रशासनाने रेल्वे गेट क्रमांक 124 बंद असलेले ते गेट चालू करण्यात यावी आदर्श शेतकरी अशोक जगताप 
   विद्यार्थ्याचे मनोगत
आमच्या मडगाव गावातील 60 ते 70 विद्यार्थी दररोज ओलांडत  असून पर्यायी मार्ग गेट क्रमांक 124 बंद असलेले चालू करण्यात यावे 
माध्यमिक विद्यालय विद्यार्थी 
सोपान माणिक पाटील इयत्ता ९वी 
    विद्यार्थिनीचे मनोगत
आदरणीय स्मिताताई तुमच्या लेकरांना कुशीत घ्या आम्हा विद्यार्थिनींना होणाऱ्या त्रासाला न्याय द्या महिला सुरक्षित नसून आम्हा विद्यार्थिनींवर अन्याय होत आहे आईसाहेब आमच्या मडगाव तांदुळवाडी गावात एक वेळेस तरी भेट द्या. 
माध्यमिक विद्यालय विद्यार्थिनी 
(वैशाली सरदार राजपूत)

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद