पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथील शेतकरी भगवान पाटील यांच्या मुलाचे इंडियन आर्मी अग्निवीर (जी.डी.) मध्ये निवड,गावभर भरभरून कौतुक करुन ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी केला सत्कार...!
(जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुनील कोळी) पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे या ग्रामीण भागातील शेतकरी भगवान राजाराम पाटील यांचा चिरंजीव मनीष भगवान पाटील याचे इंडियन आर्मी अग्निवीर(जी डी) या पदावर निवड करण्यात आली. खरोखर मनिष ने आपल्या वडीलांच्या कष्टाचे फळ हे अग्निवीर(जी.डी.) मध्ये निवड करुन दिले आहे. म्हणून त्याच्या निवडीबद्दल गावभर कौतुक केले जात आहे. सर्व मुलांनी त्याच्या कडुन प्रेरणा घेतली पाहिजे की आपण ही मनीष सारखे आपल्या आईवडिलांना कष्टाचं असच फळ दिले पाहिजे. मनिष पाटील चे ग्रामपंचायत कडून शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी पंचायत समिती सदस्य ललित वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थिती म्हणून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच प्रदीप वाघ, ग्राम सदस्य गुलाब तडवी, आली मेवाती, प्रकाश चौधरी ग्रामस्थ म्हणून विनोद बोरसे, अक्षय कोळी अण्णा सोनवणे, गजानन पाटील, अल्लाह तडवी व गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments
Post a Comment