पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील नवनिर्वाचित तलाठी सौ पल्लवी वाघ मॅडम यांचा सत्कार करण्यात आला
पाचोरा प्रतिनिधी : पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे (पाचोरा)माननीय जळगाव जिल्हाधिकारी श्रीयुत आयुष प्रसाद साहेब यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागातील तलाठी व मंडळाधिकारी महसूल सहाय्यक शिपाई ड्रायव्हर यांच्या 15 ऑगस्ट रोजी प्रशासकीय बदल्या झालेल्या असून त्या बदल्यांमध्येच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नांद्रा मंडळ मधील सजा बांबरुड राणीचे येथील तलाठी श्री दीपक शिवाजी दवंगे यांच्याकडे असलेला अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय बदली होऊन नवनिर्वाचित तलाठी सौ. पल्लवी वाघ यांनी बांबरुड राणीचे(पाचोरा) तलाठी पदाचा 15 ऑगस्ट रोजी कार्यभार घेतला असून त्यांचा गुलाबपुष्प ,बुके, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या शुभ प्रसंगी कोतवाल, सर्व सदस्य, पदाधिकारी व बांबरुड राणीचे गावातील सर्व ग्रामस्थ इत्यादी... उपस्थित होते
Comments
Post a Comment