प्रांताधिकारी कार्यालयात अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न..

(पाचोरा, प्रतिनिधी राजेंद्र खैरनार)
पाचोरा येथील प्रांताधिकारी कार्यालयात आज गुरुवार दि.५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आगामी काळात येणाऱ्या श्री गणेश स्थापना व ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांनी सण उत्सव शांततेत पार पाडावे अशा उपस्थितांना सुचना दिल्या. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, पोलिस निरीक्षक अशोक पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ओ. एस. काजवे, विज वितरण कंपनीचे अभियंता भरत उकलकर यांचेसह गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद