प्रहार दिव्यांग क्रांती संघटने तर्फे बांबरुड राणीचे येथे शाखेचे उद्घाटन सोहळा संपन्न झाले
दिनांक १८/०९/२०२४ रोजी बांबरुड (राणीचे) ता.पाचोरा जि.जळगाव येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटने तर्फे शाखेचे उद्घाटन सोहळा
बांबरुड राणीचे येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखेचे उद्घाटन करण्यात आले अध्यक्ष स्थानी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री.दीपक पाटील साहेब, जळगाव जिल्हा सचिव श्री.राजू दादा आहिरे साहेब , चाळीसगांव तालुका अध्यक्ष श्री.शांताराम पाटील पाचोरा तालुका अध्यक्ष श्री.महेश नीलंगु गोंड साहेब, पाचोरा उप शहर अध्यक्ष श्री.अनिल लोनारी तसेच ग्रामपंचायतीचे उप सरपंच श्री.प्रदीप प्रतापराव वाघ ग्रा.प.सदस्य श्री.मनोज चंद्रकांत वाघ
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची कार्यकारिणी जाहीर केली असून शाखा अध्यक्ष चि.विजय श्रीराम पवार, उपाध्यक्ष श्री.राजू अर्जुन निकम, सचिव श्री.संग्राम पुंडलिकराव आढाव, सह सचिव चि.अविनाश भास्कर दारकोंडे सल्लागारपदी श्री.माधवराव रामदास सोनवणे (सर), खजिनदार श्री.सचिन लखू काळे सदस्य सचिन ज्ञानेश्वर गोराडे, राजेंद्र मधुकर वाणी,फारुख गफुर मेवाती यांची निवड करण्यात आली.
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. महेश निलंगू गोंड साहेब यांनी सभेला सुरुवात करत शासनाच्या योजनांची माहिती दिली ज्या कोणी दिव्यांग बांधवांचे कागदपत्रे अपूर्ण असतील त्यांनी लवकरच पूर्ण करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला योजनांचा लाभ घेता येईल, त्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी एक संघटित होऊन आपला हक्क मिळून घ्यावा
तसेच उप सरपंच साहेब श्री.प्रदीप प्रतापराव वाघ यांनी दिव्यांगाना शासनाने ठरवून दिलेल्या परिपत्रकानुसार ५% निधी दिवाळी पर्यंत दिला जाईल, दिव्यांग बांधवांना विना अट घरकुल असेल किंवा मालमत्ता करामध्ये जी काही सूट देता येईल ती आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न आमच्याकडून राहील दिव्यांग बांधवांना शासकीय कामासाठी निशुल्क कागदपत्रे देण्यात येतील असे त्यांनी आश्वासन सभेतून केले.
तसेच गावातील दिव्यांग बांधव आणि भगिनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील लक्ष्मण पवार, अजाब भगवान पाटील, निवृत्ती लोटन बोरसे ,प्रमोद भारत कोकणे, धनराज छोटू पाटील ,प्रदीप अशोकराव आढाव, श्री शिवाजी रामराव वाघ श्री. जितेंद्र नथू साळुंखे, श्री. संचलाल किसन दारकोंडे, विलास बारकू वाघ, श्री. साहेबराव उत्तम बडगुजर, विकी यशवंतराव आढाव, भिकन रमजान तडवी, तनवीर रशीद तडवी, रमेश गिरधर जोडगन, राजेंद्र रामदास पवार, मंगल यादव मेहरे, सौ. मनीषा सुनील पवार आणि पत्रकार बंधू श्री. सुनील कोळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment