पाचोरा पिटीसी संस्थेचे चेअरमन नानासो.संजय ओंकार वाघ यांनी नुकत्याच गरीब कुटुंबाच्या घराला शाॅर्टसर्किट होऊन जीवनावश्यक वस्तू व मुलांचे शैक्षणिक शालेयपयोगी साहित्य जळुन खाक झाली होती,याची दखल घेत त्यांनी शालेय साहित्याचे दिली मदत...!
बांबरुड राणीचे येथे दिनांक 10.9.2024 वार मंगळवार रोजी विद्युत शॉर्टसर्किट होऊन श्री गणेश कोळी यांच्या घरातील संसार उपयोगी जीवनाश्यक वस्तू जळून खाक झाल्या तसेच त्यांच्या मुलीचे सर्वच शैक्षणिक साहित्य देखील जळून खाक झाले
*ही राणीचे बांबरुड येथील ग्रामीण पत्रकार व पाचो-यातील पत्रकार राजेंद्र खैरनार यांनी ह्या बातमीची माहिती कळवताच तातडीने दखल घेऊन पिटीसी संस्थेचे चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ आणि डॉ.राम मनोहर लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बांबरुड राणीचे येथील शालेय समिती चेअरमन श्री अण्णासो दगाजीराव वाघ यांनी पुढाकार घेऊन इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असणारी कु. लक्ष्मी गणेश कोळी या विद्यार्थिनीला शालेय गणवेश पुस्तके, वह्या, पाण्याची बॉटल,दप्तर इत्यादी वस्तू शाळेच्या माध्यमातून भेट म्हणून दिल्यात.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. व्ही. पाटील सर. यांनी बोर्डाची फी देण्याचे जाहीर केले.यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री. सचिन साळुंखे सर यांनी रोख 500 रुपयांची रोख मदत केली तर श्री.गुलाब वाघ सर यांनी दहवीचा एकवीस अपेक्षित संच घेऊन देण्याचे आश्वासन दिले.यावेळी सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनी व शिक्षकेतर कर्मचारी बंधू उपस्थित होते
Comments
Post a Comment